सूर्य किंवा चंद्रग्रहण आणि त्यांच्या प्रकारांबाबत खगोलप्रेमींना कायमंच उत्सुकता असते. येत्या 25 ऑक्टोबर रोजी भारतातील काही भागांतून खग्रास सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे. त्यामुळेच ग्रहण कसे बघावे आणि त्याच्या प्रकारांबाबत माहिती देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि एक्लिप्स चेसर्स ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यग्रहण निरीक्षण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सूर्यग्रहण कार्यशाळा
सूर्यग्रहणाचे प्रकार आणि ग्रहण बघताना डोळ्यांची घ्यायची काळजी याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात येणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही माहिती देण्यात येणार असून झूल लाईव्हद्वारे यामध्ये खगोलप्रेमींना सहभाग घेता येणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.00 ते 8.15 पर्यंत शैलेश संसारे हे मराठीतून ग्रहण आणि त्यांच्या प्रकारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर 21 ऑक्टोबर रोजी अभिषेक चिटणीस हे इंग्रजीतून या विषयाबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत. सर्व वयोगटासाठी ही कार्यशाळा खुली आहे.
सूर्यग्रहण निरीक्षण कार्यक्रम
तसेच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.30 ते 6.00 या वेळेत सूर्यग्रहण निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून खगोलप्रमींना प्रत्यक्ष सूर्यग्रहण पाहता येणार आहे. त्याआधी 2.00 ते 4.30 या वेळेत ग्रहण कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. आदित्य देसाई हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
Topic: सूर्य ग्रहणा बद्दल अधिक महिती जाणुन घ्या ऑन झूम – लाईन प्रेझेंटेशन
Time: Oct 20, 2022 07:00 PM India
Join Zoom Meeting
Meeting ID: 859 6899 6721
Passcode: 788593