Solar Energy : रेफ्युजी १ आणि २ गावांतील सौर ऊर्जा प्रकल्प मेजर कौस्तुभ यांना समर्पित

80

१९४७च्या विभाजनानंतर निर्वासितांनी वसलेली ही २ गावे  म्हणून त्यांचे नाव – रेफ्युजी १ आणि २. स्वातंत्र्यानंतरच्या ७५व्या वर्षी गुरेज या भागात वीज पोहचली खरी पण सीमेलगत असल्याने या गावांपर्यंत ती वीज पोहचू शकली नाही. भारतीय सैन्याने असीम फाउंडेशनला येथे सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Energy) उभा करण्यास सांगितले. फाउंडेशनने हे आव्हान स्वीकारले. फोक्सवॅगन (आय टी) ही कंपनी साथीला उभी राहिली आणि हे काम बघता बघता २५ ऑगस्टला पूर्ण होत आहे.

(हेही वाचा Faiz Hameed: पाकिस्तानी लष्कराने माजी ISI प्रमुखाला ताब्यात घेतलं; कोर्ट मार्शलचे आदेश)

मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते उद्घाटन 

गुरेज हा भाग महाराष्ट्रातील आपल्या सगळ्यांच्या माहितीचा आहे. कारण ६ वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यामध्येच पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी रोखताना मेजर कौस्तुभ राणे हे याच भागात हुतात्मा झाले. त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना सैन्याकडून ‘सेना मेडल’ तर महाराष्ट्र सरकारकडून ‘गौरव’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. आपला हा प्रकल्प (Solar Energy) तिथे साकारला जात असताना या प्रकल्पाला या वीरास समर्पित करावे हे असीम फाउंडेशनने ठरवले आणि मग असा विचार झाला की, या प्रकल्पाचे उद्घाटन मेजर कौस्तुभ राणे यांच्याच कुटुंबीयांनी करावे. त्यासाठी पालक अगदी लगेच तयार झाले. येत्या २७ ऑगस्टला हे सौर ऊर्जेचे प्रकल्प – मेजर कौस्तुभ यांना समर्पित करत सुरु करण्यात येणार आहे. “Lest We Forget” हे वाक्य कायम उराशी जपण्याची राष्ट्रीय एकात्मता उद्यानातील शपथ ‘असीम’ मध्ये कायमच कृतीत उतरवण्याचा आमचा ध्यास आहे, Project Kaustubh हे त्याचेच एक उदाहरण.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.