Aseem Foundation : सिमरी गाव सौरऊर्जेने झाले प्रकाशमय; हुतात्मा जवानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला प्रकल्प

45
Aseem Foundation : सिमरी गाव सौरऊर्जेने झाले प्रकाशमय; हुतात्मा जवानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला प्रकल्प
Aseem Foundation : सिमरी गाव सौरऊर्जेने झाले प्रकाशमय; हुतात्मा जवानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला प्रकल्प

काश्मीरच्या (Kashmir) दुर्गम कर्नाह खोऱ्यात वसलेले सिमरी हे सीमावर्ती गाव आतापर्यंत तिथल्या दुर्गमतेसाठी आणि अंधारासाठी ओळखले जात होते. आता सैन्याच्या मदतीने याठिकाणी पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्या गावात लष्कराने सर्व घरे सौरऊर्जेने प्रकाशमान केली आहेत. देशातील पहिले मतदान केंद्र (बूथ क्रमांक १) याच गावात आहेत. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या गावाचा अर्धा भाग शेजारच्या देशातून स्पष्टपणे दिसतो. आतापर्यंत या गावातील लोकांचे जीवनमान अंधारमय होते. अनियमित वीजपुरवठ्यामुळे लोक रॉकेल आणि लाकूड जाळून प्रकाश तयार करायचे. मुले या रॉकेलच्या दिव्यावरील मंद प्रकाशात अभ्यास करत असत. मात्र सूर्य मावळताच गावातील इतर कामे थांबत असतं. (Aseem Foundation )

( हेही वाचा : Tamil Nadu च्या राज्यपालांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा; स्टेट युनिफॉर्म स्कूल सिस्टीम फोरमला पोटशूळ

असीम फाउंडेशन सहकार्याने उभारला सौरऊर्जा प्रकल्प

गावकऱ्यांच्या आवाहनावरून भारतीय लष्कराच्या चिनार कोरने पुण्यातील असीम फाउंडेशनच्या (Aseem Foundation) सहकार्याने ‘ऑपरेशन सद्भावना’ (Operation Sadbhavna) अंतर्गत, गावातील घरांना सौरऊर्जेद्वारे प्रकाशमान केले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, गावात आता चार सौरऊर्जा क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे, जिथे २४ तास वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रगत सौर पॅनेल, इन्व्हर्टर आणि बॅटरी बँक बसवण्यात आल्या आहेत. आता गावातील सर्व ५३ घरांमध्ये एलईडी लाईट आहेत. (Aseem Foundation )

येथे एकूण ३४७ लोक राहतात ज्यांच्यासाठी ओव्हरलोडपासून वाचण्यासाठी सुरक्षित पॉवर सॉकेट्स आणि लिमिटर्स बसवण्यात आले आहेत. नवीन एलपीजी कनेक्शन आणि डबल बर्नर स्टोव्हमुळे लाकडी स्टोव्हवरील अवलंबित्व कमी झाले आहे. त्यामुळे धुरामुळे होणाऱ्या आजारांमध्ये घट झाली आहे आणि खोऱ्यातील पर्यावरणाचे रक्षण झाले आहे. एवढेच नाही तर असीम फाउंडेशनच्या अभियंत्यांनी स्थानिक तरुणांना ही व्यवस्था राखण्याचे प्रशिक्षण दिले आहे, जेणेकरून हे गाव दीर्घकाळ स्वावलंबी राहील. लष्कराचे म्हणणे आहे की हा प्रकल्प कर्नल संतोष महाडिक (Colonel Santosh Mahadik) यांना समर्पित आहे, ज्यांना शौर्य चक्र (मरणोत्तर) देण्यात आले आहे. दि. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना कर्नल महाडिक (Colonel Santosh Mahadik) यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देत हुतात्मय पत्करले. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांवरील प्रेम आणि त्यांच्या निर्भय नेतृत्वाबद्दल त्यांना अजूनही आदराने आठवले जाते. (Aseem Foundation)

हुतात्मा कर्नल संतोष महाडीक (Colonel Santosh Mahadik) यांच्या आई इंदिरा महाडिक (Indira Mahadik), तंगधार ब्रिगेडचे कमांडर आणि कुपवाडाचे (Kupwara) उपायुक्त यांच्यासोबत या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करतील. सैन्य आणि सरकारसाठी हे गाव केवळ एक वस्ती नाही तर आशेचा किरण बनले आहे. कर्नल महाडिक यांच्या आठवणीने इथले प्रत्येक घर यापुढे प्रकाशमान होणार आहे. (Aseem Foundation)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.