देश यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयटीबीपी जवानांनी लद्दाख येथे मायनस 40 डिग्री तापमानात 15 हजार फुट उंचीवर तिरंगा फडकवला.
यावेळी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि भारतीय सैन्याच्या जवानांनी भारत माता की जय! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभा असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लद्दाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायले. यासोबतच हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत आयटीबीपीच्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.