गोवरची लागण वाढत असताना लसीकरणापासून वंचित राहिलेली काही बालके ही गावी जन्मला आल्याचे समोर येत आहे. घाटकोपर येथील ८ महिन्यांची चिमुरडी सध्या गोवरचे पूरळ गेल्यानंतर लक्षणेविरहीत होऊनही आता आयुष्याची लढाई लढत आहे.
( हेही वाचा : FIFA 2022 : ‘फिफा’मध्ये धर्मांध मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर हुसेन, भारताच्या आक्षेपानंतर कतारचा खुलासा)
घाटकोपर येथील अशोकनगर मधील ८ महिन्यांची मुलगी ही गावी जन्माला आली. तिला जन्मानंतरचे केवळ बीसीजी लस दिली गेली. त्यानंतर तिला कोणतीही लस पालकांनी दिली नाही. १४ नोव्हेंबर रोजी चिमुरडीच्या शरीरावर पुरळ उठले होते, तिला ताप आणि खोकलाही येऊ लागला. पालकांनी तिला घरातच ठेवले होते. आठवड्याभरांतर शरीरावरील पुरळ गेल्यानंतरही तिची सर्दी, खोकला आणि तापातून सुटका होईना. चार दिवसांपूर्वी तिला पालकांनी अत्यंत खालावलेल्या अवस्थेत टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला गोवरची बाधा नसली तरीही मुलीची तब्येत गंभीर असून, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. राधा घिल्डीयाल यांनी दिली.
दीड वर्षांचा मुलगाही ऑक्सिजनवर
गोवंडीतील शिवाजीनगरमधील दीड वर्षांचा मुलगा लक्षणविरहीत आहे. या मुलालाही गोवर प्रतिबंधात्मक लस दिलेली नाही. त्याला केवळ सुरुवातीला साडेतीन महिन्यापर्यंत नवजात बालकांना दिल्या जाणा-या लसी पालकांनी दिल्या. या बालकाला ताप आणि पूरळ येत असताना तब्बल २० दिवस पालकांनी स्थानिक डॉक्टराकडे उपचार दिले. या उपचारानंतर आठवड्याभराने त्याची तब्येत खालावली. पालकांनी त्याला टिळक रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळाच्या चार वर्षांच्या बहिणीच्या शरीरावर अगोदर २५ दिवसांपूर्वी पूरळ दिसले होते, त्यानंतर मुलालाही लक्षणे आढळली, अशी माहिती आईने डॉक्टरांना दिली. दीड वर्षांचा मुलगा गेल्या आठवड्याभरापासून ऑक्सिजनवर आहे. तर तिच्या बहिणीबाबत डॉक्टरांना आईने जास्त माहिती दिली नाही.
१८ नोव्हेंबर रोजी गोवंडीतील शिवाजीनगरमधून आठ महिन्यांचे बाळ टिळक रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांना तपासादरम्यान त्याला न्यूमोनिया आणि ताप असल्याचे आढळले. उपचारादरम्यानच बाळाच्या शरीरावर पूरळ दिसल्याने डॉक्टरांनी तातडीने त्याला व्हेटिंलेटरवरच कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे.
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आकडीच्या त्रासामुळे ४ वर्षांच्या मुलीला दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांना तिच्या शरीरावर पूरळ दिसताच तब्बल २० दिवस तिला उपचार दिले गेले. यशस्वी उपचारानंतर मुलीची गोवरमधून सुटका झाली. मात्र गोवरनंतरच्या उपचारांसाठी पालकांनी १६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल केले. तिची काळजी घेतल्यानंतर नुकताच तिला डिस्चार्ज देण्यात आला.
या सर्व रुग्णांना आम्ही अ जीवनसत्वाच्या दोन्ही गोळ्या, प्रतिजैविके दिल्याची माहिती डॉ. राधा घिल्डीयाल यांनी दिली.