Monsoon Diseases : पावसाळी आजारांचा प्रतिबंध करण्याचे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय

191
Monsoon Diseases : पावसाळी आजारांचा प्रतिबंध करण्याचे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय
Monsoon Diseases : पावसाळी आजारांचा प्रतिबंध करण्याचे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय

जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे आता मुंबईत लेप्टोचे रुग्ण वाढले आहेत. मुंबईत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात १ हजार २७४ गेस्ट्रोचे रुग्ण आढळून आले आहेत. तर हिवतापाचे रुग्ण ४१५ लेप्टोचे रुग्ण २४९ रुग्णांची नोंद झाली आहे. पावसाळी हवामान जंतूंच्या पैदाशीसाठी आणि फैलावासाठी पोषक परिस्थिती तयार करते. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आणि सर्दी, फ्लू, अंगावर चट्टे येणे, ताप, थकवा जाणवणे यांसारख्या आजारांना प्रतिबंध करणे मान्सूनमध्ये अत्यंत महत्त्वाचे होऊन जाते. योग्य वैयक्तिक स्वच्छता जपण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय याबाबत इंडस हेल्थ प्लसचे आरोग्यतज्ज्ञ अमोल नाईकवडी यांनी टिप्स दिल्या आहेत.

वैयक्तिक स्वच्छता जपण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय – 

  • स्वयंपाक बनविण्याआधी आणि बाथरूमचा वापर केल्यानंतर आपले हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवा.
  • शिंकताना किंवा खोकताना आपले तोंड आणि नाक टिश्यूने झाकून घ्या किंवा खोकताना हातांऐवजी हाताच्या बाहीने तोंड झाका.
  • शरीरावर कुठेही कापून हलकी जखम झाली असल्यास तो भाग स्वच्छ धुवून त्याला बॅण्डेज करा.
  • गंभीररित्या कापले असेल किंवा प्राण्याचा चावा असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्या.
  • जखमांवरील किंवा डागांवरील खपल्या उचकटू नका किंवा मुरुमे फोडू नका. असे केल्याने जंतूंना शरीरात प्रवेश करण्याची संधी मिळते.

आजाराची लागण टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना  :

लसीकरण :

अनेक गंभीर संसर्गांना लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येतो. हातामध्ये दुखणे किंवा थोडासा ताप यांसारखे लसींचे काही सर्वसामान्य दुष्परिणाम संभवतात पण सर्वसाधारणपणे या लसी सुरक्षित आणि परिणामकारक असतात. आपल्या लसीकरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा.

अन्न सुरक्षा आणि स्वच्छ पेयजल :

बहुतांश प्रकरणांमध्ये अन्नातून होणारी विषबाधा ही प्राणघातक नसते, पण त्यातील काही प्रकारच्या फूड पॉयझनिंगमुळे किडनी निकामी होणे आणि मेंदूज्वरासारखी गंभीर वैद्यकीय स्थिती निर्माण होऊ शकते. अन्न सुरक्षितपणे शिजविणे आणि साठविणे यामुळे फूड पॉयझनिंगच्या बहुतांश प्रकारांचा प्रतिबंध केला जाऊ शकतो.

साठलेल्या पाण्याचा निचरा करा :

साठलेले, स्थिर पाणी म्हणजे डासांना अंडी घालण्यासाठी चांगली जागा असते. घरामध्ये कुठेही उघड्यावर पाणी साठविलेले नाही ना, याची खातरजमा करून घ्या. कृपया पाणी योग्य भांड्यांनी झाकून ठेवा. घराच्या जवळपास कुठे पाणी साचले असेल तर त्याच्या निचरा करण्यासाठी पाठपुरावा करा. यामुळे मलेरियासारख्या घातक आजाराचा फैलाव थांबेल.

आंघोळीच्या पाण्यात जंतूनाशक वापरा :

आंघोळीच्या पाण्यात जंतूनाशक टाकायला विसरू नका. यामुळे पावसाळी आजारांपासून संरक्षणासाठी हा खात्रीलायक उपाय समजला जातो.

निकस अन्न खाऊ नका:

पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायला हवे. ओल्या दिवसांमध्ये उघड्यावर टाकलेल्या अन्नावर सूक्ष्मजीवजंतू तयार होऊ आणि वाढू शकतात. अशा दिवसांत हे पदार्थ कितीही चवदार वाटले तरीही त्यातून विषबाधा होण्याची किंवा इतर आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते.

(हेही वाचा – Heavy Rain : संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची हजेरी; रत्नागिरीत दरड कोसळल्याने ८० नागरिकांचे स्थलांतर)

१ जुलै ते २३ जुलैपर्यंत पावसाळी आजारांची आकडेवारी – 

पावसाळी आजार रुग्णसंख्या – 

  • हिवताप ४१५
  • लेप्टो २४९
  • डेंग्यू ४०६
  • गेस्ट्रो १ हजार २७४
  • हेपेटायटीस १११
  • चिकनगुनिया २०
  • स्वाईन फ्लू ६१

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.