काही गोष्टी चौकटीहेरच्या असतील; डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी S Jaishankar यांचे विधान

54
काही गोष्टी चौकटीच्या बाहेरील असतील; डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी S Jaishankar यांचे विधान
काही गोष्टी चौकटीच्या बाहेरील असतील; डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी S Jaishankar यांचे विधान

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अनेक धोरणांमुळे जागतिक घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण पालट होऊ शकतात. ते अनेक गोष्टी पालटतील. कदाचित् काही गोष्टी चौकटीच्या बाहेरील असतील; पण देशहिताच्या दृष्टीने परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात आपण खुले असले पाहिजे. अशी काही सूत्रे असू शकतात ज्यावर आम्ही सहमत नसू; परंतु अशी अनेक क्षेत्रे असतील जिथे गोष्टी आमच्या कार्यक्षेत्रात असतील, असे उद्गार भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी काढले आहेत.

(हेही वाचा – अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे विधान)

ते दिल्ली विद्यापिठाच्या (Delhi University) हंसराज महाविद्यालयात बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ. जयशंकर (S Jaishankar) यांना अमेरिकेच्या संदर्भात प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.

डॉ. जयशंकर यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाबद्दल सांगितले की, भारतीय नसलेलेही आता स्वत:ला भारतीय म्हणवत आहेत. ‘परदेशात रहाणारे भारतीय अजूनही त्यांच्या साहाय्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. जो देशाबाहेर जातो, तोच आमच्याकडे येतो. आम्ही बाहेरचे रक्षक आहोत’, असेही डॉ. जयशंकर यांनी सांगितले.

भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रवादी आहेत. ‘गेल्या ८० वर्षांपासून अमेरिकेने एक प्रकारे संपूर्ण जगाचे दायित्व घेतले आहे, जे निरुपयोगी आहे’, असे ट्रम्प यांना वाटते. ‘जगात अमेरिकेकडून जो खर्च केला जातो, तो अमेरिकेतच केला पाहिजे’, अशी त्यांची विचारसरणी आहे. आमच्या दृष्टीने भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे ट्रम्प यांच्याशी वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध आहेत. ट्रम्प यांची काही धोरणे भारतासाठी ‘आऊट ऑफ सिलॅबस’ (चौकटीच्या बाहेरील) असू शकतात, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर (S Jaishankar) यांनी येथे दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.