रविवारी कोकण रेल्वेच्या ‘या’ ट्रेन पनवेलवरून सुटणार…

114

येत्या शनिवारी (दि. 22 जानेवारी) रोजी कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेलपर्यंतच धावणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी (दि. 23 जानेवारी) काही गाड्या पनवेल येथूनच सुटणार आहेत. मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा या दोन स्थानकांच्या दरम्यान रेल्वेमार्गाच्या सुधारणेचे काम सुरू असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी, 23 जानेवारी रोजी मुंबई-मडगाव आणि मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांचा प्रवास CST ऐवजी पनवेल येथे समाप्त

याबाबत कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 23 जानेवारी रोजी सुटणारी 22119/22120 क्रमांकाची छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. इतर गाड्यांमध्ये केलेला बदल असा 16346 क्रमांकाची 21 जानेवारी सुटणाऱ्या तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेस गाडीचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल येथे समाप्त होईल. 12052 क्रमांकाची मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस आणि 10112 मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस या 22 जानेवारी सुटणाऱ्या दोन्ही गाड्यांचा प्रवास छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी पनवेल येथे समाप्त होईल.

(हेही वाचा –चिनी सैन्याकडून 17 वर्षीय भारतीय मुलाचं अपहरण, सुटकेसाठी प्रयत्न सुरू)

एका दिवसापुरतााच असणार हा बदल

या दोन गाड्यांसह मांडवी एक्स्प्रेस गाडी 23 जानेवारी रोजी पनवेल येथून सुटणार आहे.  16345 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, 12051 क्रमांकाची छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आणि 10103 क्रमांकाची छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, अशा त्या गाड्या असणार आहे. हा बदल २३ जानेवारी या एका दिवसापुरतााच असल्याचे कोकण रेल्वेच्या पत्रकात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.