दिवाळी म्हणजे हिंदूंसाठी अतिशय आनंदाचा आणि भरभराटीचा सण. (Somvati Amavasya) या वर्षी रविवार १२ नोंव्हेंबर हा सण आपण साजरा करणार आहोत. आता या शुभ-मुहूर्ताच्या जोडीला सोमवती अमावस्या हा दुर्मिळ योग साधून आला आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीला सुख, समृद्धी आणि वैभवासाठी महालक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते.
आता दिवाळीच्या दिवशी सोमवती अमावास्या येणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी स्नान, ध्यान आणि दान केल्याने पुण्य मिळते. याशिवाय पितरांसाठी पिंडदान, तर्पण विधी, दान आणि श्राद्ध केले जाते. दिवाळीच्या दिवशी सोमवती अमावस्येला लक्ष्मीची पूजा केली तर शुभ लाभ प्राप्त होतात. चला तर याविषयी सगळं काही जाणून घेऊया. (Somvati Amavasya)
(हेही वाचा – Delhi Pollution : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; ‘हे’ तातडीने थांबवले पाहिजे)
सोमवती अमावस्या कधी आहे ?
या वर्षी सोमवती अमावस्या कार्तिक अमावस्येला येत आहे. रविवारी १२ नोव्हेंबर ला दुपारी ०२.४४ वा अमावस्या सुरु होईल आणि सोमवारी २३ नोव्हेंबर ला दुपारी ०२.५६ ला संपेल. त्यामुळे दिवाळी आणि सोमवती अमावस्या असा सुंदर योग जुळून आला आहे.
सोमवती अमावस्येचे महत्त्व
सोमवती अमावस्येचे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि सर्व संकटे दूर होतात. हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. आता तर दैवयोगाने दिवाळीच्या दिवशी सोमवती अमावस्येचा योग असल्याने लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांच्या पूजेसोबतच भगवान शिवाची पूजा केल्याने भाग्योदय होऊ शकेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करुन पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. शक्य असल्यास दिवसभर जेवणात मीठ वापरू नये. सोमवती अमावस्या म्हणजे अध्यात्मिक आणि भौतिग प्रगतीचा महामार्ग. (Somvati Amavasya)
३ महत्त्वाचे शुभ योग
विशेष म्हणजे सोमवती अमावस्येला ३ शुभ योग निर्माण झाले आहेत. सौभाग्य, शोभन आणि सर्वार्थ सिद्धी योग. हे तिन्ही योग अतिशय महत्वाचे आहेत. सौभाग्य योग सकाळपासून दुपारी ३.२३ पर्यंत आहे. त्यानंतर शोभन योग सुरू होईल, जो संपूर्ण रात्रभर असेल आणि सोमवती अमावस्या तिथीला सर्वार्थ सिद्धी योग १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ०३:२३ ते ०६:४३ पर्यंत आहे.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रविवार, १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:४० ते ७:३६ पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची उपासना केल्याने धन आणि सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते व टिकून राहते. त्यामुळे लक्ष्मी पूजन करून लक्ष्मी आकृष्ट करा. (Somvati Amavasya)
पितृदोषासाठी सोमवती अमावस्येचे महत्व
पितृदोषाचा त्रास होत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितृ दोषावरील उपाय सकाळी ११.०० ते दुपारी ०२.३० पर्यंत करू शकता. त्या दिवशी स्नान केल्यानंतर पितरांसाठी तर्पण, पिंडदान, अन्नदान, ब्राह्मणभोजन, पंचबली कर्म इत्यादी करू शकता. यावर पितर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही त्रिपिंडी श्राद्ध करू शकता. असे केल्याने दोष दूर होऊन समृद्धी प्राप्त होईल. (Somvati Amavasya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community