नेहरूंनी लिहिलेली पत्रे पळवल्या प्रकरणी गांधी कुटुंब येणार अडचणीत? Pradhanmantri Sangrahalaya कारवाई करण्याच्या तयारीत

यासंबंधी गांधी कुटुंबियांशी Pradhanmantri Sangrahalaya ने केलेले पत्रव्यवहार लवकरच सार्वजनिक केली जातील, असे डॉ. कादरी यांनी सांगितले.

136
नेहरूंनी लिहिलेली पत्रे पळवल्या प्रकरणी गांधी कुटुंब येणार अडचणीत? Pradhanmantri Sangrahalaya कारवाई करण्याच्या तयारीत
नेहरूंनी लिहिलेली पत्रे पळवल्या प्रकरणी गांधी कुटुंब येणार अडचणीत? Pradhanmantri Sangrahalaya कारवाई करण्याच्या तयारीत

काँग्रेसच्‍या नेत्‍या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु (Jawaharlal Nehru) यांची वैयक्‍तिक पत्रे परत करावीत, अशी मागणी पंतप्रधान संग्रहालयाने केली आहे. यासंदर्भात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान संग्रहालय सोसायटीचे सदस्य डॉ. रिझवान कादरी यांनी पत्र पाठवले आहे. याविषयी हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीने डॉ. रिझवान कादरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही याविषयी कायदेशीर कारवाई करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे सांगितले.

पीएमएमएल रेकॉर्डनुसार, मार्च २००८ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या कागदपत्रांपासून वैयक्तिक कागदपत्रे आणि सरकारी-संबंधित कागदपत्रे वेगळे करण्याचे कारण सांगत सोनिया गांधी यांनी ५ मे २००८ ला ही पत्रे असलेल्या ५१ पेट्या घेऊन गेल्या मात्र त्या अद्याप परत केल्या नाहीत. हा विषय अत्यंत गंभीर असून राज्यसभेतही यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता पुन्हा आम्ही स्मरणपत्र पाठवले आहे. याविषयीची सर्व कागदपत्रे लवकरच सार्वजनिक केली जातील, तसेच आम्ही याविषयी कायदेशीर कारवाई करण्याच्या दिशेने विचार करत आहोत.

– डॉ. रिझवान कादरी, सदस्य, पंतप्रधान संग्रहालय सोसायटी.

देशात 2008 मध्‍ये काँग्रेस नेतृत्त्‍वाखाली संयुक्‍त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयात असणारी पंडित नेहरु यांची पत्रे मागवली होती. पंडित नेहरूंची ही वैयक्तिक पत्रे ऐतिहासिक मानली जातात. यापूर्वी ही पत्रे जवाहरलाल नेहरू मेमोरिअलकडे होती. १९७१ मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला देण्यात आली होती. आता हे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. पंडित नेहरू यांनी अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजय लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत इत्यादी महान व्यक्तींमधील संभाषणांवर आधारित ही पत्रे आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet : राज्यातील ‘हे’ १७ जिल्हे मंत्रीपदापासून वंचित! वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.