सोनू सूदने आरोग्य व्यवस्थेसमोर टेकले हात! 

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून एकांडा शिलेदाराप्रमाणे कोरोनाबाधितांना सहाय्य करणाऱ्या अभिनेता सोनू सूदला दुसऱ्या लाटेतही राज्य सरकारची नकारघंटा ऐकू येत आहे. 

73

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे कि, त्यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारची आरोग्य व्यवस्था सपशेल अपयशी ठरू लागली आहे. वेळीच योग्य उपाययोजना आणि निर्णय न घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडली आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या ज्या काही साधनसामग्रींची गरज भासते, त्याची कोणतीही पूर्व तयारी न करता राज्य सरकार डोळेझाकपणे कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे, त्याचा परिणाम म्हणून राज्याची आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली आहे. याचा प्रत्यय स्वतः अभिनेता सोनू सूद याला आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सोनू निष्कामपणे समाजसेवा करत आहे, दुसऱ्या लाटेतही सोनू सूदने तितक्याच तळमळीने समाजकार्याला सुरुवात केली आहे. अशा वेळी सोनूला पुन्हा एकदा सरकारी नकारघंटा ऐकू येऊ लागली आहे.

काय म्हटले आहे सोनू सूदने? 

  • सोनू सूद म्हणतो, माझ्याकडे ५७० कोरोनाबाधित रुग्णांनी त्यांना रुग्णालयात खाट उपलब्ध करू देण्याची विनंती केली, त्यापैकी मला केवळ ११२ जणांसाठीच खाटा उपलब्ध करून देता आल्या.
  • माझ्याकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी  १,४७७ रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करावी, अशी विनंती केली. मी मात्र केवळ १८ इंजेक्शन उपलब्ध करू शकलो.
  • होय, मी अपयशी ठरलो आहे, हीच का आपली आरोग्य व्यवस्था आहे?

 कोरोनाबाधित असूनही सोनू समाजासाठी लढतोय! 

सध्या सोनूला कोरोनाची लागण झाली आहे. तो उपचार घेत असून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. असे असतानाही सोनू याही परिस्थितीत एकांडा शिलेदाराप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला धावून जात आहे. दिवस-रात्र त्यांना बसल्या ठिकाणाहूनही शक्य होईल तशी मदत करत आहे.

सोनूच्या ट्विटर आणि फेसबूकवर मदतीसाठी याचना! 

सोनूच्या ट्विटर हॅण्डल आणि फेसबुकवर देशभरातील कानाकोपऱ्यातून कोरोनाबाधित मदतीची याचना करत आहे. त्यासाठी पोस्ट अक्षरशः खच पडला आहे. यावरून कोरोनाची परिस्थिती किती बिकट आहे, याचा प्रत्यय येतो आहे.

(हेही वाचा : कडक निर्बंधांमध्ये प्रवासी गाड्या चालू राहणार का? रेल्वे मंत्रालयाने दिले उत्तर!)

पहिल्या लाटेत सोनूला सरकारचा आला कटू अनुभव! 

पहिल्या कोरोना लाटेत या रोगाविषयी कोणतीही माहिती नव्हती. संसर्ग झपाट्याने होतो, म्हणून तात्काळ देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून मुंबई, महाराष्ट्रातील लाखो परप्रांतीय मजुरांची उपासमार सुरु झाली. त्यामुळे ते पुनः त्यांच्या घरी परतण्यासाठी धडपडू लागेल, परंतु जिल्हा, राज्यांच्या सीमा बंद होत्या. त्यामुळे अनेकजण महाराष्ट्राच्या सीमेवर अडकून होते. अनेकजण राज्यातील विविध जिल्ह्यांच्या सीमेवर अडकून पडले होते. त्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरक्षितपणे पाठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती, मात्र सरकार काही करत नाही, म्हणून अशा हजारो कामगारांसाठी सोनू धावून आला. स्व खर्चाने बसगाड्या करून त्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवून दिले. सोनूचे नाव चर्चेत येऊ लागले, सोनूची व्यवस्था सरकारी यंत्रणेचे अपयश अधोरेखित करू लागल्यावर सोनूला भाजपावाल्यांचे पाठबळ आहे, त्याला भाजपवाले पैसा पुरवतात, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती.

सोनूच्या मागे लावला चौकशीचा ससेमिरा! 

संजय राऊत यांच्या आरोपामुळे सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्याच्या मनातील निर्मळ भावना विषद केली. तरीही काही दिवसांनी सोनूचे जुहू येथील निवासस्थान असलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाईची नोटीस लावली. सोनूने कोणतीही परवानगी न घेता इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्याचा आरोप लावण्यात आला आणि त्यावर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी महापालिकेने केली. याप्रकरणी सोनूच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.