- ऋजुता लुकतुके
सोनी कॉर्पोरेशन आणि झी एंटरटेनमेंट लिमिटेड या कंपन्यांमधील बहुचर्चित करार अखेर सोनी कंपनीने एकतर्फी संपुष्टात आणला आहे. इतकंच नाही तर कोर्टातील खटल्यावर खर्च झालेली ९० दशलक्ष अमेरिकन डॉलरची रक्कमही त्यांनी झी कंपनीकडे मागितली आहे. हा करार जर प्रत्यक्षात आला असता तर एकत्रीकरणातून तयार झालेली कंपनी देशातील सगळ्यात मोठी मीडिया कंपनी असणार होती. (Sony-Zee Deal Called Off)
पण, डिसेंबर २०२१ पासून कराराच्या वाटाघाटी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत हा करार पूर्णत्वास येणं अपेक्षित होतं. पण, ते झालं नाही. त्यातच आधी ठरल्याप्रमाणे झीचे पुनीत गोयंका यांना नवीन कंपनीचे प्रमुख करण्यास सोनीचा विरोध होता. त्यामुळेही गेल्या दोन महिन्यांत या दोन कंपन्यांमध्ये वितुष्ट आलं होतं. झी एंटरटेनमेंट कंपनीच्या विनंतीवरून सोनीने करार पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी एका महिन्याने वाढवली होती. पण, तोपर्यंत समझोता न झाल्यामुळे आता सोनीकडूनच हा करार रद्द करण्यात आल्याचं समजतंय. (Sony-Zee Deal Called Off)
या घडीला उद्योग क्षेत्रातील ही सगळ्यात मोठी बातमी बनली आहे. सोनीने करार रद्द केल्याची नोटीस झी एंटरटेनमेंटला पाठवल्यानंतर झीने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय ९० दशलक्ष अमेरिकन डॉलर देण्यासही नकार दिला आहे. आता झी कंपनी सोनी विरुद्ध कोर्टात जाण्याची तयारी करत असल्याचं समजतंय. (Sony-Zee Deal Called Off)
SONY CORP PRESS RELEASE
Zee Sony Merger Deal Called Off
No extension, termination notice sent by Sony to Zee Ent pic.twitter.com/fALXHads9e
— Yatin Mota (@YatinMota) January 22, 2024
(हेही वाचा – Balasaheb Thackeray Birth Anniversary : पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली)
म्हणून केला करार रद्द
चांगल्या सकारात्मक वातावरणात सुरू झालेल्या या कराराच्या वाटाघाटी अचानक कटुतेमध्ये परिवर्तित झाल्यामुळे या करारबद्दल बोललं जात आहे. ‘आम्ही चांगल्या हेतूने आधीच्या कराराची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवली. पण, तोपर्यंतही कराराच्या अटींची पूर्तता होत नव्हती. आणि यापेक्षा जास्त थांबणं आम्हाला शक्य नाही. त्यामुळे हा करार रद्द करण्याचं आम्ही ठरवलंय,’ असं सोनी पिक्चर्स कंपनीने टोकयो शेअर बाजारात दाखल केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (Sony-Zee Deal Called Off)
कराराच्या वाटाघाटी २०२२ च्या मध्यापर्यंत सुरळीत सुरू होत्या. पण, झीचे संस्थापक आणि अध्यक्ष सुभाषचंद्र गोयंका यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाल्यानंतर प्रकरण चिघळत गेलं. वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा सुरुवातीला सुभाषचंद्र यांचा मुलगा पुनीत गोयंका नवीन कंपनीचे प्रमुख होणार असं ठरलं होतं. पण, सोनीने २०२२ नंतर त्याला विरोध केला. स्वच्छ चारित्र्य असलेली व्यक्ती कंपनीला प्रमुखपदी हवी होती, असं तेव्हा बोललं जात होतं. उलट झी कंपनी सुरुवातीला पुनीत गोयंका यांच्या नावावर ठाम होती. नंतर त्यांनी आपला पवित्रा थोडा बदलला. पण, तोपर्यंत सोनी पिक्चर्सनी करार रद्द करण्याचा निर्णय ठामपणे घेतलेला दिसत होता. अखेर २१ जानेवारीची मुदत संपल्यानंतर सोनी कंपनीने लगेचच हा करार रद्द करत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. (Sony-Zee Deal Called Off)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community