सरकारी नोकरी अपडेट! ‘या’ विभागात होणार ‘२७७६’ पदांची भरती!

148

लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने दिलासा दिला आहे. राज्यात तब्बल २ हजार ७७६ पदांची भरती निघणार आहे. पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात अर्थात पीडब्ल्यूडीमध्ये २ हजार ७७६ पदांची भरती निघणार आहे.

( हेही वाचा : बूस्टर प्रक्रियेत मुंबईला मागे टाकत ‘या’ जिल्ह्याची सरशी! )

सार्वजनिक बांधकाम विभागात भरती 

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी १ हजार ५३६ जागा रिक्त असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी -२ व कनिष्ठ अभियंत्यांची एकूण १ हजार २४० पदे रिक्त आहेत. ही रिक्ते पदे भरणे आवश्यक आहेत त्यामुळे, या एकूण २ हजार ७७६ पदासांठी राज्यात लवकरच भरती निघणार आहे. या पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

( हेही वाचा : सावधान! ‘वीजबिल भरा…’ असा SMS तुम्हाला तर आला नाही ना… )

सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.