Nose- Ear-Throat Specialist: डीजेच्या आवाजामुळे कानांच्या तक्रारी वाढल्या; तज्ज्ञांनी दिला सल्ला, वाचा सविस्तर…

आवाज ९० डेसिबलच्या आतच हवा

173
Nose, Ear, Throat Specialist: डीजेच्या आवाजामुळे कानांच्या तक्रारी वाढल्या; तज्ज्ञांनी दिला सल्ला, वाचा सविस्तर...
Nose, Ear, Throat Specialist: डीजेच्या आवाजामुळे कानांच्या तक्रारी वाढल्या; तज्ज्ञांनी दिला सल्ला, वाचा सविस्तर...

डीजे, स्पीकर, डीजे लेझर, पारंपरिक वाद्ये, कर्णकर्कश्श शिट्ट्या…यांच्या ठेक्यावर तासन् तास नाचत गणपती विसर्जन झाले खरे, पण त्यानंतर फॅमिली डॉक्टरांसह नका, कान, घसा तज्ज्ञांकडे (Nose-Ear-Throat Specialist) तपासणीसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात जात असल्याची माहिती समोर आली आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्ये आणि डीजे प्रचंड मोठा (dj sound) आवाज ८३ डेसिबलपासून १२९ डेसिबल इतका होता. यामध्ये थिरकलेल्यांच्या कानात शिटी वाजवल्याचा आवाज येणे, ऐकू कमी येणं, कान दुखणे, सुन्न पडणे, कानाला दडा बसणे, चक्कर येणे… अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत. नाक, कान, घसा तज्ज्ञांच्या मते, काही जणांना त्रास झाला नसला तरी काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याची शक्यता वाढली आहे.

(हेही वाचा – Mumbai Drugs : समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या ‘चरस’ची मुंबईत विक्री, दोघांना अटक)

कोणतेही डिव्हाईस वापरले तरी उपयोग नाही…
याविषयी नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. विनया चितळे यांनी सांगितले की, मोठा आवाज ही कानाची विषबाधा आहे. आताची विशीतली तरुणाई जेव्हा चाळीशीला पोहोचेल, तेव्हा ही समस्या निर्माण होईल. अजून पंधरा ते वीस वर्षांनी कानाच्या नसा कमकुवत होऊन कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका वाढला आहे. कोणतेही डिव्हाईस म्हणजे हिअरिंग एड लावले तरीदेखील उपयोग होणार नाही.

तज्ज्ञांचा सल्ला…
प्रचंड मोठ्या आवाजामुळे कानाशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारचे त्रास जाणवत असल्यास रुग्णांनी डॉक्टरांकडे लवकर यावे. पाणी मारणे, गरम तेल कानात टाकणे असे घरगुती उपचार स्वत: करू नये. कानाच्या नसा नाजूक असतात. कानाच्या त्रासामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह थांबतो. नसांना रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे कानांच्या नसांचे काम कमी होतो. त्यासाठी ९० डेसिबलच्या आतच आवाज हवा, असा सल्ला डॉ. नेत्रा पाठक यांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.