दक्षिण मध्य मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्ज भरण्याआधीच प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्याचा निर्धार शेवाळे यांनी केला आहे. अर्ज भरण्यापूर्वी शेवाळे यांनी प्रचार रॅली काढून आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा पक्षाचे सचिव व राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना पक्षाने उमेदवारी घोषित केली आहे. मात्र,अनिल देसाई हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीतच व्यस्त आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली असली तरी प्रचार फेरींमध्ये गुंतून न राहता देसाई यांनी पदाधिकार, कार्यकर्ते त्यांच्या भेटी गाठीकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचारांत शेवाळेंनी जोर धरला असला तरी देसाईंचा भेटीगाठीतच मोर नाचत असल्याचे दिसून येत आहे. (South Central Mumbai Lok Sabha Constituency)
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर शेवाळे यांनी या संपूर्ण मतदारसंघात रॅली काढून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. गुढीपाडव्यापासून प्रचाराचा शुभ मुहूर्त साधून शेवाळेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शुक्रवारी १२ एप्रिल रोजी शेवाळे (Rahul Shewale) यांनी वडाळा किडवाई मार्ग पोलिस स्टेशन जवळ संवाद यात्रेपासून प्रारंभ केला, त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता शीव धारावी रोड येथील मनोहर जोशी ज्युनिअर कॉलेज हॉलमध्ये महायुतीचा निर्धार मेळावा आयोजित केला. (South Central Mumbai Lok Sabha Constituency)
(हेही वाचा – Ramdas Athawale : विरोधकांकडून संविधान बदलण्याबाबत अफवा पसरविण्याचे काम)
त्यानंतर शनिवारी १३ एप्रिल रोजी सकाळी केना मार्केट, मोची गल्लीपासून सुरु झालेली प्रचार रॅली महापालिका कार्यालय, भवानी माता मंदिर ३०० टेनामेंट्स याठिकाणी याचा समारोप केला. तर त्याच सोमवारी १५ एप्रिल रोजी माहिम विधानसभेमधील कासारवाडीपासून सुरु झालेल्याचा रॅलीचा समारोप दादर पश्चिम उपेंद्र नगर येथे करण्यात आला. तर त्याच दिवशी सायंकाळी शीव कोळीवाडा विधानसभा मतदार संघातील हनुमान मंदिर ते नुरा मार्केट सीजीएस कॉलनी सेक्टर २ पासून सुरुवात झालेल्या प्रचार फेरीचा समारोप अँटॉप हिल पोस्ट ऑफीसजवळ झाला. (South Central Mumbai Lok Sabha Constituency)
तर मंगळवारी सकाळी चेंबूर विधानसभा मतदार संघातील पी एल लोखंडे मार्गापासून सुरु झालेल्या रॅलीचा समारोप महापालिका कॉलनी बाल सदगुरु मित्र मंडळ, मुंजाळ नगर येथे समारोप करण्यात आला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच शेवाळेंनी प्रचारात बाजी मारली असून शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल देसाई यांनी मात्र शाखांना तसेच इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मंडळांना आणि संस्थांना भेटी देऊन आपली ओळख परेड करून देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अनिल देसाई हे पक्षाच्या तसेच इतर पक्षांच्या कार्यक्रमात शिवाय धार्मिक उत्सव आणि सणांमध्ये हजेरी लावण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. (South Central Mumbai Lok Sabha Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community