South Korean Plane Crash: विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, ८५ प्रवासी ठार

138
दक्षिण कोरियातील (South Korea) मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचा मोठा अपघात झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना जेजू एअरलाइन्सच्या (Jeju Airlines plane crash) विमानाचा अपघातात 85 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाच्या संरक्षक भिंतीला (Jeju Air Flight 2216 ) धडकले, असे सांगण्यात येत आहे. या विमान अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या बचावकार्य सुरू आहे. (South Korean Plane Crash)

 


लँडिंगदरम्यान भिंतीवर आदळले 

मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना (Muan Airport) विमान घसरले आणि संरक्षक भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. जखमी रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, विमानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 32 फायर इंजिन आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले होते. 
(हेही वाचा –मध्य रेल्वेच्या मुंबई, पुण्यासह इतर स्थानकांवर तात्पुरती Platform Tickets विक्री बंद; हे आहे कारण )
लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाला
प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड (Landing gear failure) झाल्यामुळे हा अपघात झाला. या विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह एकूण 181 लोक होते. (South Korean Plane Crash)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.