दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार? भाजपा की मनसे! याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण ही जागा मनसेला दिल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जावी अशी अट भाजपाकडून घातली जात आहे. मात्र, मनसेने इंजिन चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. दक्षिण मुंबईतून इंजिन चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनसे ठाम असल्यामुळे मनसेसोबत युती होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार मनसेला आता सर्वच लोकसभा क्षेत्रात उमेदवार उभे करावे लागणार असून कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या दबावामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (South Mumbai Lok Sabha)
मागील लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभे न करणाऱ्या मनसेला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बहुतांशी मतदारसंघात आपले उमेदवार उभे करावेत अशा प्रकारची सूचना वजा मागणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून केली जात आहे. शिवसेना-भाजपा यांच्यासोबत मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात असून या युतीच्या माध्यमातून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मनसेला सोडावा अशा प्रकारची मागणी पुढे येत आहे. त्यामुळेच ही जागा मनसेला सोडण्याबाबत भाजपा आणि मनसेमध्ये चर्चा सुरू आहे. मनसेला जागा सोडल्यास त्यांच्या उमेदवाराने कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी सूचना भाजपाकडून केली जात आहे. (South Mumbai Lok Sabha)
(हेही वाचा – Rahul Gandhi उबाठाला अडचणीत आणणार?)
इंजिन चिन्हावरच निवडणूक लढवण्यास मनसे ठाम
परंतु मनसेचे निवडणूक चिन्ह हे इंजिन असल्याने इंजिन चिन्हावरच हे निवडणूक लढवण्यास मनसे पक्ष कायम आहे. त्यामुळे युती झाल्यास आणि मतदारसंघ सोडून कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनसे तयार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदार संघ आणि कमळ चिन्हाचा अट्टाहास यामुळे युतीत मनसे सहभागी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे मनसे आता भविष्यात स्वतंत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसे स्वतंत्र निवडणूक लढवल्यास भाजपाच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. (South Mumbai Lok Sabha)
मागील काही वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्र आणि मराठी भाषा या बरोबरच मशिदींवरील भोंग्याचा विषय हाताळून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. त्यामुळे मनसे हा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जात असून त्यातून त्यांनी शिवसेनेसोबत हिंदुत्ववादी पक्ष म्हणून इंजिन निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी आणि चांगला प्रतिसाद मिळेल असे मनसेचे म्हणणे आहे. पण दक्षिण मुंबईत इंजिन चिन्ह हे तेवढे परिचित नसल्याने ते धावणे सोडा, त्यातून धूर आलेलाही पहायला मिळणार नाही, असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मतदार संघातील मनसेची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. (South Mumbai Lok Sabha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community