Southern Chile Fire : चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत १९ जणांचा मृत्यू, ११०० घरे जळून खाक

राष्ट्रपती बोरिक यांनी देशात आणीबाणीची स्थिती केली जाहीर, तसेच जंगलातील आग विझवण्यासाठी सर्व सैन्य तैनात करण्यात आले आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

328
Southern Chile Fire : चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत १९ जणांचा मृत्यू, ११०० घरे जळून खाक

मध्य आणि दक्षिण चिलीमधील दाट लोकवस्तीच्या परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये (Southern Chile Fire) किमान १९ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे ११०० घरे जळून खाक झाली आहेत.

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक (Southern Chile Fire) यांनी देशात आग पसरू नये यासाठी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. “जंगलातील आग विझवण्यासाठी सर्व सैन्य तैनात करण्यात आले आहे”, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन सेवांची बैठक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.’

(हेही वाचा – Nitin Gadkari : राज्यातील विविध प्रकल्पांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी देणार)

चिलीचे (Southern Chile Fire) अंतर्गत मंत्री कॅरोलिना टोहा म्हणाले की, देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात सध्या ९२ जंगलांना आग लागली आहे, जिथे या आठवड्यात तापमान असामान्यपणे जास्त आहे. सर्वात भीषण आग वालपाराइसो भागात लागली, जिथे अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जेणेकरून अग्निशमन दलाचे ट्रक, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने आत जाऊ शकतील. किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले. (Southern Chile Fire)

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला)

ते म्हणाले की, क्विलपुए आणि व्हिला (Southern Chile Fire) अलेमाना शहरांजवळ शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) दोन आगीमुळे किमान ८००० हेक्टर (१९,७७० एकर) जमीन जळून खाक झाली आहे. त्यापैकी एक आग किनारपट्टीवरील रिसॉर्ट शहर विना डेल मारला धोक्यात आणत होती. वालपाराइसो परिसरात तीन निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. बचाव पथके अधिक प्रभावित भागात पोहोचण्यासाठी धडपडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १९ हेलिकॉप्टर्स आणि ४५० हून अधिक अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. (Southern Chile Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.