- ऋजुता लुकतुके
केंद्र सरकार पुढील वर्षीपासून सोव्हरिन गोल्ड बाँड योजना बंद करू शकतं. १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात हा निर्णय जाहीर होऊ शकतो. कारण, या अर्थसंकल्पात या योजनासाठी नवीन तरतूद होण्याची शक्यता कमीच आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढत आहेत आणि आगामी वर्षातही किमती वाढण्याचीच शक्यता आहे. अशावेळी या बाँडवरील परतावाही वाढत आहे आणि त्यामुळे हा बाँड सरकारला परवडेनासा झाला आहे. (Sovereign Gold Scheme)
चालू वर्षात १८,५०० कोटी रुपयांचे सोव्हरिन गोल्ड बाँड जारी करण्याची करण्यात आले आहेत. या बाँडवर सरकार २.५ टक्क्यांनी व्याज देते आणि हे व्याज सोन्याच्या वाढत्या किमतीवर परवडेनासं झालं आहे. कमोडिटी तज्ञ लक्ष्मण रॉय याविषयी म्हणतात, ‘सोन्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे सुवर्ण रोखे जारी करण्यात आले होते. पण सोन्याच्या वाढत्या किमती आणि या योजनेवर भरावे लागणारे व्याज यामुळे सरकार ही योजना बंद करू शकते.’ (Sovereign Gold Scheme)
(हेही वाचा – पोलिसांना Google Map ने आसामऐवजी नेले नागालँडला; स्थानिकांनी घुसखोर समजून केला हल्ला)
गेल्या ३-४ वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेल्या जोरदार वाढीमुळे सुवर्ण रोखे योजना दुप्पट परतावा देत आहे. गुंतवणूकदारांसाठी हे फायदेशीर आहे, परंतु ही योजना सरकारसाठी तोट्याचा सौदा ठरत आहे. लोकांचा सोन्याचा वापर कमी व्हावा आणि त्यामुळे सरकारची सोने आयात कमी व्हावी या उद्देशाने २०१५ मध्ये रिझर्व्ह बँकेने सोव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरू केली. (Sovereign Gold Scheme)
या योजनेत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलोग्राम सोन्याची गुंतवणूक करू शकते. संयुक्त होल्डिंगच्या बाबतीत, ४ किलोंची गुंतवणूक मर्यादा फक्त पहिल्या अर्जदारावर लागू होईल. तर कोणत्याही ट्रस्टसाठी खरेदीची कमाल मर्यादा २० किलो आहे. यातील सोन्याचे दर हे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने प्रकाशित केलेल्या २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीशी जोडलेली आहे. यासोबतच ते डिमॅट स्वरूपात ठेवता येते, जे अगदी सुरक्षित आहे आणि त्यावर कोणताही खर्च नाही. हे वार्षिक २.५% व्याज देते आणि सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने फायदे वाढतात. (Sovereign Gold Scheme)
(हेही वाचा – ICC Test Ranking : जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम, रिषभ पंत पहिल्या दहांत)
२०१५-१६ मध्ये जेव्हा सोव्हरिन सुवर्ण बाँड योजना सुरू करण्यात आली तेव्हा त्याची प्रति ग्रॅम किंमत २,६८४ रुपये होती. यावर ५० रुपयांची सूट होती. म्हणजेच किंमत २,६३४ रुपये झाली होती. सध्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत सुमारे ७,००० रुपये आहे. म्हणजेच ८ वर्षांत सोन्याने सुमारे १७०% परतावा दिला आहे. याशिवाय दरवर्षी २.५% व्याज देखील मिळते. (Sovereign Gold Scheme)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community