स्पॅम कॉलच्या (Spam Calls) संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) आढळले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स (यूटीएम) विरुद्ध ७.९ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या समस्येला गांभीर्याने घेत ट्राय ने १३ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व सेवा प्रदात्यांसाठी कठोर निर्देश जारी केले होते. एसआयपी, पीआरआय किंवा इतर दूरसंचार संसाधनांचा वापर करून बिगर नोंदणीकृत प्रेषक किंवा टेलीमार्केटरकडून प्रमोशनल व्हॉईस कॉल तात्काळ थांबवावेत, असे आदेश सेवा प्रदात्यांना ट्रायने दिले आहेत. या संसाधनांचा गैरवापर करताना आढळलेल्या कोणत्याही बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्सला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यामध्ये दोन वर्षांपर्यंत सर्व दूरसंचार संसाधने खंडित करणे आणि काळ्या यादीत टाकणे समाविष्ट आहे. (Spam Calls)
(हेही वाचा – ओलीसांना वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल PM Benjamin Netanyahu यांनी मागितली माफी)
या निर्देशांच्या परिणामी, सेवा प्रदात्यांनी स्पॅमिंगसाठी (Spam Calls) दूरसंचार संसाधनांच्या दुरुपयोगाविरूद्ध कठोर पावले उचलली आहेत आणि ५० हून अधिक संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे तर २.७५ लाखांहून अधिक एसआयपी डीआयडी/मोबाइल नंबर/टेलिकॉम संसाधनांची जोडणी खंडित केली आहे. या पावलांचा स्पॅम कॉल्स कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण परिणाम होईल अशी अपेक्षा आहे. सर्व भागधारकांनी निर्देशांचे पालन करावे तसेच स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम टेलिकॉम परिसंस्थेत योगदान द्यावे असे आवाहन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community