SPC : ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रमाला मुंबईत चांगला प्रतिसाद

33
SPC : 'स्टुडंट पोलीस कॅडेट' उपक्रमाला मुंबईत चांगला प्रतिसाद
  • प्रतिनिधी

माध्यमिक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (SPC) या उपक्रमाला मुंबईसह राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गृहमंत्रालयाच्या अखात्यारीत असणारा हा उपक्रम महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यात ९९६ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू असून ८०,००० हून अधिक विद्यार्थी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घेत आहे. मुंबईत हा उपक्रम मुंबई पोलीस राबवत असून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील ३ हजार विद्यार्थी याचा लाभ घेत आहे. मुंबईत या उपक्रमाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्र शासनाने या उपक्रमाची सुरुवात २०१८ मध्ये केली आहे. नॅशनल कॅडेड कॉर्प (NCC) च्या धर्तीवर हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबवला जात आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम इयत्ता ८ वी आणि ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून विकसित होण्यासाठी सक्षम बनवणारा आणि स्वयंशीस्त, सामाजिक जाण, संवेदनशीलता, मुल्ये, तत्वे, नैतिकता व प्रामाणिकपणा यासाठी त्यांची क्षमता वाढविणारा कार्यक्रम आहे. कायद्याची पालन करणारी आणि लवकरच आपल्या देशातील विविध क्षेत्रांमध्ये जबाबदारी उचलणाऱ्या, सामाजिकदृष्ट्या वचनबद्ध आणि सेवाभिमुख तरूणांची पिढी तयार करणे हे ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (SPC) या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम गृहमंत्रालय, भारत सरकार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय स्तरावर २०१८ पासून राबविला जात आहे. महाराष्ट्र राज्यात ९९६ शाळांची या उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेली असून ८०,००० हून अधिक विद्यार्थी या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी झाले आहेत.

(हेही वाचा – सनातन संस्थेच्या वतीने Datta Jayanti च्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !)

मुंबईत हा उपक्रम मुंबई पोलीस दलाकडून राबविण्यात येत असून मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभाग-१ यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देण्यात आलेले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये जवळपास हा उपक्रम राबविण्यात येत असून इयत्ता आठवी आणि नववीत शिकणारे ३ हजार विद्यार्थी ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (SPC) या उपक्रमाचा लाभ घेत असल्याची माहिती स्थानिक सशस्त्र विभाग-१ चे पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी दिली. स्थानिक सशस्त्र विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी पथक ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ या उपक्रमाचे काम बघतात.

‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (SPC) या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमधून इयत्ता आठवी आणि नववीतील ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यात मुलींचा देखील समावेश असतो. विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धडधाकट असावा आणि तो या उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असावा अशा विद्यार्थ्यांची शाळेकडून निवड करून त्यांची वैयक्तिक माहिती शाळेकडून ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (SPC) च्या प्रमुखाकडे दिली जाते असे पोलीस निरीक्षक दीपक पवार सांगितले. ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिक चाचणी करून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते अशी माहिती पवार यांनी दिली. आमच्याकडे सद्यस्थितीत ३ हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून गेल्या वर्षी एक हजार विद्यार्थ्यांनी स्टुडंट पोलीस कॅडेट ‘दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट’ प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती पवार यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.