किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला; केंद्रीय मंत्री Amit Shah यांनी केले आवाहन

126
किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला; केंद्रीय मंत्री Amit Shah यांनी केले आवाहन
किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला; केंद्रीय मंत्री Amit Shah यांनी केले आवाहन

किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत (Mother Tongue) बोला. जर तुम्ही हे केलं नाही तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. कारण जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही, तर त्यांचं आजोबाशी नातं जोडणार कसं? आता आई वडिलांना वेळ नसतो, फक्त आजी आजोबांना वेळ असतो त्यामुळे मातृभाषा येणं गरजेचं आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.

(हेही वाचा – आम्ही तुम्हाला आमचे समजतो; Rajnath Singh यांनी असे का म्हटले ?)

बॉम्बे नको मुंबई हवं आहे

राज्यात सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार चालू आहे. अनेक केंद्रीय नेत्यांचे दौरे आयोजित केले जात आहेत. घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही मुंबई दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शाह यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत आगमन झालं. दर वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत लालबागचा राजा गणपतीचे दर्शन अमित शाह घेणार आहेत. त्यानंतर महायुतीच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिगृहावर जातील. त्याआधी अमित शाह यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी त्यांनी मातृभाषेचे महत्त्व सांगितले. या वेळी शाह यांनी मुंबईच्या नावाची आठवणही सांगितली.

अमित शाह म्हणाले, “बॉम्बे (Bombay) नको मुंबई (Mumbai) हवं आहे, ही मागणी ज्या वेळी सुरू झाली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवं ही मागणी करणारा होतो. त्या वेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की मुंबईच हवं.’ गेल्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा मुंबईच महत्व कमी करत असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाला अप्रत्यक्षरित्या उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इतिसाहाचा दाखला दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.