यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य रेल्वेतर्फे १५६ गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये संपूर्ण अनारक्षित गाडीचाही समावेश आहे. अनारक्षित गाडी वगळता अन्य सर्व गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण २७ जूनपासून सुरू होणार आहे.
या गाड्यांचा तपशील असा – १) मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (४० फेऱ्या)- 01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात दररोज मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01172 सावंतवाडीहून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबेल.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ आणि परत (२४ फेऱ्या) – गाडी क्र. 01167 स्पेशल एलटीटी वरून १३, १४, १९, २०, २१, २४ ते २८ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये १ आणि २ तारखेला रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01168 कुडाळ येथून १४, १५, २०, २१, २२, २५ ते १९ सप्टेंबर आणि २ तसेच ३ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री १० वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबेल.
३) पुणे-कुडाळ विशेष (६ सेवा) – गाडी क्र. 01169 १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुण्याहून सायंकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01170 स्पेशल कुडाळहून १७, २४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबेल.
४) करमाळी-पनवेल (साप्ताहिक – ६ सेवा) गाडी क्र. 01187 १६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेतीन वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01188 पनवेलहून १७, २४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता करमळीला पोहोचेल. ही गाडी थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव येथे थांबेल.
५) दिवा–रत्नागिरी मेमू संपूर्ण अनारक्षित १२ डब्यांची गाडी क्र. 01153 दिवा येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात दररोज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुपारी ३ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01154 रत्नागिरीतून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी दिवा येथे पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
६) मुंबई – मडगाव विशेष साप्ताहिक (४० सेवा) गाडी क्र. 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात दररोज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01152 मडगावहून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात दररोज पहाटे सव्वातीन वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी येथे थांबेल.
Join Our WhatsApp Community