प्रजासत्ताक दिनी राज्यातील 189 कैद्यांना देणार विशेष माफी

भारतीय स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेला आहे. चांगली वर्तवणूक व इतर निकषांनुसार याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने गुरुवारी दिली आहे.

कोणते निकष लागणार?

केंद्रीय गृह मंत्रालयाने कैद्यांना मुक्त करण्यासाठी ठरविलेल्या निकषानुसार, 15 जानेवारी 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 जानेवारी 2023 अशा तीन वेळा विशेष माफी देऊन मुक्त केले जाणार आहे. कैद्यांनी त्यांचे गुन्हेगारी जीवन साेडून देशाचे जबाबदार नागरिक बनावे याकरिता ही याेजना अंमलात आणली जात आहे. कैद्यांचे कारागृहातील वर्तन याकरिता चांगले असणे आवश्यक आहे. ज्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी कैद्याचे (वय 50) वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी त्यांचे शिक्षेचा 50 टक्के कालावधी पूर्ण केला आहे, त्यांचा याबाबत विचार केला जाईल. 70 टक्क्यांपेक्षा अधिक शारीरिकदृष्टया दिव्यांग कैदी ज्यांनी त्यांची निम्मी शिक्षा भाेगलेली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेले बंदी, ज्या कैद्यांचा शिक्षेचा कालावधी संपलेला आहे परंतु ज्यांना न्यायालयाने दिलेल्या दंडाची रक्कम भरता न आल्याने कारागृहातून साेडण्यात न आलेले कैदी तसेच ज्या कैद्यांनी त्यांचे 18 ते 21 वर्षाच्या वयाेगटात अपराध केला परंतु त्यानंतर काेणता अपराध न करता 50 टक्के शिक्षा भाेगलेली आहे, अशा कैद्यांचा विशेष माफी कैद्यात समावेश करण्यात आलेला आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना या याेजनेचा लाभ मिळणार नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आलेले आहे. विशेष माफी अंर्तगत सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांना समाजात पुर्नवसन करण्यासाठी मार्गदर्शन सत्राचेही आयाेजन करण्यात येणार आहे.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींचा मुंबईत मेट्रोने प्रवास; सर्वसामान्यांशी साधला संवाद)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here