हार्बर आणि पश्चिम मार्गावरीस अंधेरी ते गोरेगाव (Andheri to Goregaon Special Block) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर नॉन इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी रविवारी (29 सप्टेंबर) रात्री विशेष ट्रॅफिक (Special traffic), पॉवर ब्लॉक (Power block) घेण्यात येणार आहे. परिणाम या काळात अंधेरी ते गोरेगाव मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत. (Special Block)
असा असणार ब्लॉक
ब्लॉक दिनांक : दि. २९ आणि ३० सप्टेंबर (रविवार – सोमवार मध्यरात्री)
विभाग: अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील अंधेरी ते गोरेगाव
कालावधी : ००.३० पासून ते १०.३० पर्यंत (१० तास ब्लॉक)
(हेही वाचा – हिंमत असेल तर संपवून दाखवा; Uddhav Thackeray यांचे अमित शहांना आव्हान)
ब्लॉकपूर्वी आणि नंतरच्या शेवटच्या आणि सुरुवातीच्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक
- ब्लॉकपूर्वी डाऊन हार्बर मार्गावर गोरेगावसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.५४ वाजता सुटेल आणि गोरेगावला २३.४९ वाजता पोहोचेल.
- ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता अप हार्बर मार्गावर शेवटची लोकल गोरेगावहून ००.०७ वाजता (मध्यरात्री) सुटेल आणि ०१.०२ वाजता (मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
- ब्लॉकनंतर डाऊन हार्बर मार्गावर गोरेगावसाठी सकाळी पहिली लोकल (म्हणजे दि. ३०.०९.२०२४ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.२२ वाजता सुटेल आणि ११.१६ वाजता गोरेगाव येथे पोहोचेल.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल (म्हणजे दि. ३०.०९.२०२४ रोजी) अप हार्बर मार्गावर गोरेगावहून सकाळी ११.२३ वाजता सुटेल आणि १२.२१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (Special Block)
(हेही वाचा – ज्यांनी मेट्रोच्या कामाचा एक पिलर टाकला नाही ते आता छात्या बडवत आहेत; DCM Devendra Fadanvis यांचा विरोधकांवर घणाघात)
हे दुरुस्तीसाठीचे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community