३ हजारात साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन; नवरात्रीसाठी एसटीची विशेष सुविधा

126

नवरात्रीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भाविक साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेतात. यासाठी आता एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारात नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठांसाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. २७ आणि ३० सप्टेंबरला ३ बसेस रवाना होणार असून, भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : स्टेट बॅंक नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख)

एसटी बसेसचे प्रवासमार्ग व राहण्याची व्यवस्था 

२७ आणि ३० सप्टेंबरला सकाळी ६ वाजता एसटी (साधी) बस निघणार आहे. ही बस पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज मार्गे कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तश्रृंगी या ठिकाणी भेट देऊन पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे येईल. या प्रवासावेळी तुळाजापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगी अशा तीन ठिकाणी प्रवाशांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रवासाचे भाडे २ हजार ६९५ रुपये भाडे असणार आहे.

तसेच शिवाजीनगर येथून ३० सप्टेंबरला एसटीची (शयनयान) बस सकाळी ७ वाजता निघणार आहे. ही बस शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज मार्गे कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्टश्रृंगी या मार्गाने पुन्हा शिवाजीनगरला येईल. या सहलीमध्ये सुद्धा तुळजापूर, माहूरगड, सप्तश्रृंगी येथे राहण्याची व्यवस्था केली जाईल. याचे भाडे ३ हजार ६४५ रुपये असणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग करा 

या साडेतीन शक्तीपीठांसाठी बसचे आरक्षण करायचे असल्यास तुम्ही www.msrtc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आरक्षण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.