शासकीय कार्यालयात दिव्यांगांना फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी राज्य शासनाकडून ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून ठाणे जिल्ह्यातील शिव समर्थ विद्यालयात पार पडणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिंना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दिव्यांगांना वारंवार सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. काही वेळेस या योजनांचा लाभ घेण्यासाठी अवश्यक असलेले दाखले त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. दिव्यांग व्यक्तींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात प्रत्येक विभागासाठी स्टॅाल उभारण्यात येणार आहेत.
(हेही वाचा Mhada : म्हाडाचे घर आमदारासाठी झाले ‘न परवडणारे घर’-)
दिव्यांग व्यक्तिंना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासन विविध योजना राबवते. यामध्ये ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या योजनेअंतर्गत मतदार नोंदणी, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, शिधावाटप पत्रिका, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले काढणारा स्टॅाल, संजय गांधी निराधर योजना, दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना अशा विविध योजनांचे स्टॉल या ठिकाणी असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community