Traffic Police यांची विशेष मोहीम; ‘या’ कारणांमुळे ६९२ ई-बाईक जप्त

162
एकीकडे वाहन अपघाताचे प्रमाण वाढत चालले असताना, वाहतुकीचे नियम (Traffic rules) पाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आणि शासनाकडून वारंवार आवाहन केले जाते. परंतु, त्यानंतरही बेशिस्त ई-वाहन चालक वाहकाविरोधात विशेष मोहित घेत कारवाईचा बडगा उचलला गेला. या कारवाईत ११ दिवसांत ६७२ ई-बाईक्स (E-bikes) जप्त करण्यात आल्या. तसेच खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या १८० दुचाकी वाहनावर ई-चलान (E-Bike Challan) कारवाई करण्यात आली. (Traffic Police)

(हेही वाचा – Thirty First Party : अपघात रोखण्यासाठी बार, पब आणि पार्टीच्या बाहेर पोलीस तैनात)

ही आहेत कारणे
मुंबईमध्ये घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करणारे अनेक तरुण भरधाव वेगात दुचाकी चालवून नियमभंग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सिग्नल न पाळणे, हेल्मेट न वापरणे, विरुद्ध दिशने वाहन चालवणे, मर्यादेपेक्षा वेगाने दुचाकी हाकणे या नियमभंगांबाबत वाहतूक पोलिसांकडे (Traffic Police) तक्रारी येत होत्या. अलीकडे या तक्रारींचा ओघ वाढला होता. ई-बाईकविरोधात वाहतूक (Traffic police action against e-bikes) विभागाने १८ ते २९ डिसेंबर रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत १८१ गुन्हे नोंदवून ६७२ ई-बाईकस् जप्त करण्यात आल्या. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्यांच्या १८० दुचाकी वाहनावर ई-चलान कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा –  शहरातील रस्ते कामाची ACB कडे तक्रार, नार्वेकर यांची चौकशी करण्याची मागणी)

हेल्पलाईनवर तक्रार करा-वाहतूक पोलीस

रम्यान, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे ई-बाईकस् (E-bikes) चालक व डिलेव्हरी बॉयची नागरिकांनी मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या (Mumbai Traffic Control Branch) हेल्पलाईनच्या २४९३७७५५ २४९३७७४६ २४९४०३०३ या नंबरवर तक्रार करावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.