उन्हाळी सुट्टीनिमित्त धावणार विशेष रेल्वे गाड्या!

189

पर्यटन आणि गावी जाण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून एप्रिल ते जून या कालावधीत 574 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी सुमारे 100 रेल्वे पुणे स्थानकातून रवाना होणार आहेत.

( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )

574 विशेष रेल्वे

दरवर्षी एप्रिलनंतर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेकडून समर स्पेशन गाड्या सोडण्यात येतात. मध्य रेल्वेकडून एप्रिल ते जून या कालावधीत 574 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेअंतर्गत मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर आणि साईनगर शिर्डी या स्थानकांतून रेल्वे धावणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे मनमाड, नागपूर, मालदा टाउन, मडगाव, शालिमार, गोरखपूर, समस्तीपूर, करमाळी, बिदर आदी मार्गांचा समावेश आहे.

100 रेल्वे पुणे स्थानकातून रवाना होणार

पुणे स्थानकातून सुमारे 100 विशेष रेल्वे धावणार आहेत. यामध्ये करमाळी, जयपूर, दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन (झाशी), कानपूर या मार्गांचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.