Special Cleanliness Campaign : तीन रात्रींमध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील ११८ टन राडारोडा उचलला

271
Special Cleanliness Campaign : तीन रात्रींमध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील ११८ टन राडारोडा उचलला
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर हाती घेण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत, आतापर्यंत तीन रात्रींमध्ये तब्बल ४१.२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. रोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेदरम्यान राबविल्या जात असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ११८.५ टन राडारोडा जमा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. (Special Cleanliness Campaign)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या स्वच्छतेची मोहीम राबविल्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेसाठी सोमवारी १७ मार्च २०२५ पासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Special Cleanliness Campaign)

(हेही वाचा – नियमबाह्य भाड्याच्या तक्रारींसाठी लवकर एकच व्हॉट्सअॅप नंबर; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा)

या मोहिमेत दोन्ही महामार्गालगतचे सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदी परिसर स्वच्छ करण्यात येत आहेत. महामार्गावरील दिशादर्शक फलक, झाडांच्या बुंध्यांची व कुंपणांची स्वच्छता व रंगरंगोटी, बस थांब्यावरील आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, रस्त्यावर अडथळा ठरणारी जुनी वाहने तसेच अनधिकृत जाहिरात फलकांचे निष्कासन, पदपथांचे पेव्हर ब्लॉक व दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करणे आदी बाबींचा समावेश आहे. (Special Cleanliness Campaign)

New Project 2025 03 20T211333.000

या विशेष स्वच्छता मोहिमेची सुरुवात १७ मार्च २०२५ रोजी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथून तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून झाली. दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता या कालावधीत पूर्व महामार्गावर शीव ते घाटकोपर, घाटकोपर ते विक्रोळी, विक्रोळी ते मुलुंड चेक नाकादरम्यान तसेच पश्चिम महामार्गावर वांद्रे ते अंधेरी, अंधेरी ते कांदिवली ९० फूट मार्ग, कांदिवली ९० फूट मार्ग ते दहिसर चेक नाका यादरम्यान विशेष स्वच्छता करण्यात आली. यात दोन्ही महामार्ग मिळून आतापर्यंत एकूण ४१.२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. (Special Cleanliness Campaign)

(हेही वाचा – राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार; मंत्री Dada Bhuse यांची माहिती)

यामध्ये ११८.५ टन राडारोडा, २२.२ टन कचरा आणि १४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण १६ यांत्रिक स्वच्छता संयंत्रांचा या मोहिमेत समावेश आहे. मागील २१ आणि २२ मार्च २०२५ रोजी पूर्व महामार्गावरील क्रमश: घाटकोपर ते विक्रोळी, विक्रोळी ते मुलुंड चेक नाका तसेच पश्चिम महामार्गावरील क्रमश: अंधेरी ते कांदिवली ९० फूट मार्ग, कांदिवली ९० फूट मार्ग ते दहिसर चेक नाका येथील स्वच्छता करण्यात येईल. (Special Cleanliness Campaign)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.