कुडाळ आणि सावंतवाडी दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या: १५ ऑगस्ट रोजी आरक्षण बुकींग

84

गणपती उत्सव २०२२ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई आणि कुडाळ/सावंतवाडी रोड दरम्यान आणखी ६ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने २०६ गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा आधीच केली आहे. त्यामुळे २०२२च्या या गणेशोत्सवाकरता कोकणात सोडण्यात येणाऱ्या एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या २१२ वर पोहोचली आहे.

मध्य रेल्वेच्यावतीने कुर्ला टर्मिनस-कुडाळ गणपती विशेष, पनवेल-कुडाळ गणपती विशेष, मुंबई-सावंतवाडी रोड गणपती विशेष अशा गाड्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी सोडल्या जाणार असून, यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी आरक्षण बुकींग केले जाणार आहे.

मुंबई – कुडाळ गणपती विशेष गाड्या

  • 01167 : विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २४ ऑगस्ट २०२२ रोजी ००.४५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी सकाळी ११.०० वाजता पोहोचेल.
  • 01168 : विशेष कुडाळ येथून २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

या स्थानकांवर थांबणार

ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

डब्यांची रचना : १८ शयनयान आणि २ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.

पनवेल – कुडाळ गणपती विशेष गाड्या

  • 01169 : विशेष गाडी २५ ऑगस्ट २०२२ रोजी पनवेल येथून ००.१० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी सकाळी ०९.०० वाजता पोहोचेल.
  • 01170 : विशेष कुडाळ येथून २४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २२.५५ वाजता पोहोचेल.

या स्थानकांवर थांबणार

रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

डब्यांची रचना : १८ शयनयान आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.

मुंबई – सावंतवाडी रोड गणपती विशेष गाड्या

  • 01171 : विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २५ऑगस्ट २०२२ रोजी १६.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल.
  • 01172 : विशेष कुडाळ येथून २६ ऑगस्ट २०२२ रोजी ०४.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.

या स्थानकांवर थांबणार

ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी.

डब्यांची रचना : ९ शयनयान, ७ अनारक्षित द्वितीय आसन श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण कसे आणि कधी कराल?

  • सर्व विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग १५ ऑगस्ट २०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
  • या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.