उच्च न्यायालयातील प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय (High Court) आणि त्यांचे खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथे ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या कालावधीत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली आहे.
(हेही वाचा – IT Jobs Future : आयटीमधील नोकऱ्यांसाठी आता ‘या’ कौशल्यांची गरज)
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, उच्च न्यायालयात (High Court) प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांचे खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथे ३० नोव्हेंबर २०२४ व १ डिसेंबर २०२४ या कालावधीत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील ज्या पक्षकांराची प्रकरणे उच्च न्यायालयातील (High Court) प्रलंबित आहेत व ही प्रकरणे तडजोडीने मिटावीत, अशी ज्यांची इच्छा आहे.
(हेही वाचा – निज्जर हत्येप्रकरणी Canada चा खोटारडेपणा उघड; संबंध बिघडण्यास ट्रूडोच जबाबदार असल्याचा भारताचा आरोप)
अशा पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहे. त्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे येथे घेण्यात येणार आहे. संबंधित पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने यात सहभागी होऊ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले आहे.
(हेही वाचा – Bahrain Violence : हत्येपूर्वी राम गोपालची नखे उपटली, विजेचा शॉक दिला ; बहराइच पोलिसांनी सांगितले नेमके काय घडले ?)
पक्षकारांना नामी संधी
उच्च न्यायालयामध्ये (High Court) बऱ्याच कालावधीपासून खटले प्रलंबित आहे. अशी प्रकरणे विशेष लोकअदालतीच्या माध्यमातून तडजोडीतून मिटविता येतात. यामुळे पैसा, श्रम आणि वेळेचीही बचत होते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद आणि मोफत न्याय मिळतो. त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community