भारताची ‘चंद्रयान-3’मोहिम यशस्वीरित्या पार पडली.अवकाश संशोधनात इतिहास रचणारी या मोहिमेला यश मिळण्यासाठी अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी अहोरात्र कष्ट घेतले.या मोहिमेला यश मिळण्यासाठी शास्त्रज्ञांनी 2019 पासून मेहनत घेत होते. यासाठी इस्त्रोकडून खास बेत करण्यात आला होता. वाचा याविषयी सविस्तर –
(हेही वाचा – Jalna Movement: जालन्यात पोलीस बळाचा वापर का केला, पोलीस महानिरीक्षकांनी केला खुलासा)
चंद्रयान-3मोहिमेतील शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले की, इस्त्रोकडून दररोज चंद्रयान-3 मोहिमेला 2019 पासून सुरुवात झाली. ही मोहिम फत्ते करण्यासाठी सलग तीन वर्षे इस्त्रोच्या अनेक शास्त्रज्ञांनी यासाठी मेहनत घेतली. अनेक शास्त्रज्ञांनी यासाठी कामाव्यतिरिक्त जास्त तासदेखील दिले. इस्त्रोकडून या शास्त्रज्ञांना दररोज मसाला डोसा आणि कॉफी दिली जात होती. या खास मेन्यूचा बेत यावेळी शास्त्रज्ञांकरिता आखण्यात आला होता. या मोहिमेत जास्त वेळा काम करणाऱ्यांना शास्त्रज्ञांना दररोज 5 वाजता इस्त्रोकडून मोफत मसाला डोसा, कॉफी आणि फिल्टर कॉफी दिली जात होती.
इस्त्रोच्या चंद्रयान-3 मोहिम काळात प्रत्येक शास्त्रज्ञाने स्वेच्छेने अतिरिक्त तासांची गुंतवणूक केली. इस्त्रोच्या या विशेष बेतामुळे चंद्रयान-3 मोहिमेतील शास्त्रज्ञांनी आनंदाने जास्त तास मोहिमेसाठी दिल्याचेही शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा यांनी मुलाखतीवेळी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community