धुलीवंदनासाठी ‘या’ भागात पोलीस झाले सतर्क! जाणून घ्या कारण

111

कोरोनानंतर तब्बल अडीच वर्षांनी यावर्षी होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे मात्र अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाद्वारे विशेष बंदोबस्त करण्यात येणार आहे. होळीच्या दिवशी अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

२ डीसीपी, ५ एसीपी, २४ पोलीस निरीक्षक, ८४ पोलीस उपनिरीक्षक, १४६० पोलिस कर्मचारी, २ आरसीपी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून व अतिरिक्त ३ एसआरपी कंपनी, ३०० होमगार्डसह सुमारे २ हजार पोलीस कर्मचारी ड्युटीवर तैनात राहणार आहेत. सोबतच ड्रंक अंड ड्राईव्ह मोहीम पण राबविण्यात येणार असून शहरात सगळीकडे पोलिसांची करडी नजर राहणार असून आवाज, गोंधळ करणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे.

( हेही वाचा : Holi New Guidelines: आता बिनधास्त साजरी करा होळी आणि धुळवड! )

पोलिसांची नजर 

बऱ्याचदा बुरा ना मानो होली है… म्हणत युवती तसेच महिलांवर जबरदस्तीने गुलाल फेकला जातो. यासाठी दामिनी पथक व अन्य पथक सक्रिय केले जाणार असून काळजी घेऊनच होळी साजरी करण्याचे आवाहन सीपी डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. होळीच्या सणामध्ये बरेच जण भांग, दारू आदि मादक पदार्थांचे सेवन करतात. यामुळे प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही लोक फुग्यांमध्ये पाणी भरून एकमेकांवर रंग फेकतात. ज्यामध्ये बऱ्याचदा भांडणे सुध्दा होतात. यामुळे असे अपघात टाळण्यासाठी अशा लोकांवरही अमरावती पोलिसांची नजर असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.