गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 19 सप्टेंबरला संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबर रोजी जुन्या इमारतीत सुरू होईल त्यानंतर 19 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन इमारतीत अधिवेशन होईल.
संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी करण्यात आले. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 970 कोटी रुपये खर्च केला आहे. संसदेची इमारत 4 मजल्यांची असून या इमारतीत 1,224 लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. ही नवीन रचना त्रिकोणी आकाराची असून आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. ही रचना राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय वृक्ष वड या तीन विषयांवर आधारित आहे. यामध्ये राष्ट्रीय फूल कमळ राज्यसभेचे प्रतिनिधित्व करते.राष्ट्रीय पक्षी मोर लोकसभेचे प्रतिनिधित्व करते, तर राष्ट्रीय वृक्ष वड मध्यवर्ती विश्रामगृहाचे प्रतिनिधीत्व करते.संसदेच्या इमारतीच्या छतावर फ्रेस्को पेंटिंग्ज, भिंतीवर श्लोकांचे वर्णन आणि संरचनेवर राष्ट्रीय चिन्ह आहेत.
नवीन इमारतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य…
संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम टाटा प्रोजेक्टसने केले आहे, आतील बांधकामाची रचना अहमदाबाद येथील कंपनी शिपी डिझाईन अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने केले आहे. हे आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ कम्युनिकेशन आणि डेटा नेटवर्क सिस्टिमच्या सुविधांसह तयार केले गेले आहे. यासोबतच व्हीलचेअरच्या सुविधेचीही काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व मंत्र्यांसाठी कार्यालय आणि सर्व मजल्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्थाही इमारतीत करण्यात आली आहे.
हेही पहा –