मुंबईतील एसी लोकल आणि मध्य रेल्वेच्या प्रथम श्रेणीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आता मध्य रेल्वे सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या आणि ए सी लोकलमधून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे चाप बसणार आहे. (special task force)
लोकलने दररोजचा प्रवास करणाऱ्या चांगला अनुभव मिळावा त्यांना एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांमुळे गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने ‘स्वतंत्र टार्स्क फोर्स’ची (Special task force) स्थापना केली आहे. या टास्क फोर्सने फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत एक स्वतंत्र व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक ७२०८८१९९८७ जाहीर करण्यात आला होता.
(हेही वाचा – Vidhan Sabha Election 2024: ‘बर्फातले प्राणी…’, वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची बॅनरबाजी! )
१४ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्स
मध्य रेल्वेने २५मे पासून उपनगरीय गाड्यांमधील अनियमित प्रवासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समर्पित टास्क फोर्स सुरू केला आहे. मोबाईल क्रमांक ७२०८८१९९८७ या व्हॉट्सॲप हेल्पलाईनमुळे प्रवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हा १४ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. या मोबाईल क्रमांकावर मदतीची मागणी करता येते.
बेकायदा प्रवासाची एकूण २,९७९ प्रकरणे उघड
ही योजना चालू झाल्यानंतर १५ जूनपर्यंत, बेकायदा प्रवासाची एकूण २,९७९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याद्वारे ज्यामुळे १० लाख ४ हजार ९८५ रुपयांचा दंड आकारला आहे. या सक्रीय कारवाईमुळे प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. दररोज १०० हून अधिक प्रकरणांवरून दि. १५ जून २०२४ पर्यंत रोज केवळ ७ प्रकरणे इतकी तक्रारींची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर दररोज १८१० लोकल फेऱ्यांद्वारे दररोज अंदाजे ३३ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. मध्य रेल्वे धावणाऱ्या एकूण ६६ एसी लोकलच्या फेऱ्यांमधून दररोज सरासरी अंदाजे ७८,००० प्रवासी प्रवास करीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community