मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकावर रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक

137

मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर ६ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज (FOB) बांधण्यासाठी गर्डर्स लाँच करण्यासाठी येत्या रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. रविवार ३ जुलै रोजी सकाळी १०.५० ते दुपारी ०१.१० पर्यंत अंबरनाथ ते वांगणी दरम्यान मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना घाट राहणार 3 महिने बंद!)

विशेष मेगाब्लॉक

  • कल्याण येथून सकाळी १०.१३ ते दुपारी १.२६ पर्यंत अंबरनाथ/बदलापूर/कर्जतकडे जाणाऱ्या लोकल आणि बदलापूर येथून सकाळी १०.२६ ते दुपारी १.२२ पर्यंत सुटणाऱ्या गाड्या रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत दरम्यान कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही.

एक्सप्रेस गाड्यांचे मार्गबदल

17032 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस हि कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येईल. कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्यांना दिवा येथे थांबा दिला जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.