दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनांसाठी पुण्याहून विशेष ट्रेन रवाना; Mantri Uday Samant यांनी दाखवला हिरवा झेंडा

84

मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली (All India Marathi Literature Conference Delhi) येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. दरम्यान या मराठी साहित्य संमेलनांसाठी (98th All India Marathi Literature Conference, Delhi 2025) पुण्यातून दिल्लीकडे विशेष महादजी शिंदे एक्सप्रेस (Mahadji Shinde Express) बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे (Delhi) रवाना झाली आहे. तसेच या एक्सप्रेसमधून १२०० साहित्यिक एकाच वेळी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या रेल्वेला भाषा मंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवला.  (Mantri Uday Samant)

(हेही वाचा – तुम्ही अतिरिक्त तिकिटे का विकता? Delhi station stampede नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने रेल्वेला फटकारले)

१९ फेब्रुवारी रोजी झेंडूच्या फुलांनी सजलेली रेल्वे गाडी… ढोल ताशांचा गजर… सोबतीला माय मराठीचा गजर आणि साहित्यिकांची मांदियाळी… स्वागतासाठी अंथरलेले रेड कार्पेट… दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात हादजी शिंदे एक्सप्रेस पुणे येथील फलाट क्रमांक १ येथून दिल्लीकडे साहित्य संमेलनासाठी रवाना झाली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी याच गाडीतून नगरपर्यंत प्रवास करत साहित्यिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील (Chancellor Dr. P.D. Patil), ज्येष्ठ कवियित्री संगीता बर्वे यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी सभासद, रेल्वेचे अधिकारी आणि साहित्य वर्ग उपस्थित होता.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.