न्यूझिलंडचा पराभव करून भारताने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियालाकडून सेमी फायनलध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील क्रिकेटप्रेमी लक्ष अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमकडे लागलं आहे. या स्टेडियमचं बुकिंग फुल्ल झालं आहे. या हजारो क्रिकेटप्रेमींची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेने वर्ल्डकप स्पेशल ट्रेन सुरू केली आहे.
यासंदर्भातील टाइम टेबल मध्य रेल्वेकडून शेअर करण्यात आलं आहे. आता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप आठव्यांदा फायनल खेळणार आहेत. १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया फायनल होईल. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवार असल्याने सामन्याचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. याकरिता मध्य रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद विशेष ट्रेन सुरू केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही ट्रेन सुटणार आहे.
(हेही वाचा – Cabinet Meeting: मंत्र्यांच्या अनुपस्थितीत शिंदेंच्या मंत्रिमंडळाने कॅबिनेट बैठकीत घेतलेले निर्णय, वाचा…कोणते? )
वर्ल्डकप स्पेशल म्हणून ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी-अहमदाबाद-मुंबई अशी ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद इत्यादी थांबे घेत ही स्पेशल ट्रेन धावणार आहे. ०११५३ हा क्रमांक असून १८ नोव्हेंबर रोजी सीएसएमटीवरून ही ट्रेन रात्री १०.३० वाजता निघणार आहे. अहमदाबादला सकाळी ६.४० वाजता ही ट्रेन पोहोचेल. २० नोव्हेंबर रोजी रात्री १.४५ वाजता अहमदाबादहून मुंबईकडे येण्यासाठी ही ट्रेन निघेल. सकाळी १०.३५ वाजता ही ट्रेन मुंबईत पोहोचेल.
Join Our WhatsApp CommunityCR will run a Cricket World Cup special train from CSMT to Ahmedabad and back-
A) 01153 CSMT- Ahmedabad special express-
CSMT departure- 22.30 hrs, 18/11/23
Ahmedabad- 06.40 hrs, 19/11/23B) 01154 Ahmedabad-CSMT special express-
Ahmedabad departure- 01.45 hrs, 20/11/23
CSMT… pic.twitter.com/KH4GhbqNIF— Central Railway (@Central_Railway) November 17, 2023