सण, उत्सव किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्या की, मुंबईतील चाकरमानी वर्ग कोकणाची वाट धरतो. कोकणात जाण्यासाठी वर्षाचे बाराही महिने रेल्वे गाड्यांचे बुकिंग फूल असते. त्यामुळे अनेकवेळा कोकणावासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात याला पर्याय म्हणून तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे ठोकूर – पनवेल आणि पनवेल – मडगाव या मार्गांवर विशेष रेल्वेगाडी सोडणार आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर; हार्बर मार्गावर होणार हाल )
पनवेल – मडगाव विशेष गाडी (एकमार्गी)
पनवेल – मडगाव (01109) ही विशेष गाडी २१ मार्च २०२२ ला ०७.५५ वाजता पनवेल येथून सुटेल आणि रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी येथे थांबेल ही, गाडी त्याच दिवशी २१.२० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
संरचना : या गाडीत एक तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह १३ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.
ठोकूर – पनवेल विशेष गाडी (एकमार्गी)
ठोकूर – पनवेल (01110) विशेष गाडी रोजी ३.३० वाजता ठोकूर येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०६.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी सुरतकल, मुल्की, उडुपी, बारकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बिंदूर, भटकळ, मुरूडेश्वर, होन्नावर, कुमठा, गोकर्णा रोड, अंकोला, कारवार, कानाकोना, मडगाव, करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा या स्थानकांवर थांबेल
संरचना : या गाडीत एक तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह १३ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.
या दोन्ही गाड्यांचे तिकिट बुकिंग १९ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा रेल्वेते NTES अॅप डाउनलोड करा. असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
Join Our WhatsApp Community