प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वेमार्गे विशेष ट्रेन चालवणार आहे. तपशिल खाली दिल्याप्रमाणे:
मुंबई – कन्याकुमारी (2 फेऱ्या )
- 01461 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 05.01.2023 रोजी 15.30 वाजता सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी 23.20 वाजता पोहोचेल.
- 01462 विशेष कन्याकुमारी येथून दि. 07.01.2023 रोजी 14.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 23.00 वाजता पोहोचेल.
- थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, तेल्लीचेरी, कोझीकोडे, तिरूर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कुलितुराई, नागरकोइल जंक्शन.
- संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन.
लोकमान्य टिळक टर्मिनस – कन्याकुमारी (४ फेऱ्या)
- 01463 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 12.01.2023 आणि 19.01.2023 रोजी 15.30 वाजता सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी 23.20 वाजता पोहोचेल.
- 01464 विशेष कन्याकुमारी येथून दि. 14.01.2023 आणि 21.01.2023 रोजी 14.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 21.50 वाजता पोहोचेल.
- थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, तेल्लीचेरी, कोझीकोडे, तिरूर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कुलितुराई, नागरकोइल जंक्शन.
- संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित,८ शयनयान,५ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन.
- आरक्षण : विशेष ट्रेन 01461/01463 चे बुकिंग विशेष शुल्कासह दि. ०१.०१.२०२३ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community