आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची २४ फेब्रुवारीला यात्रा आहे. राज्यभरात एसटीचा संप असल्यामुळे आंगणेवाडीला जाणाऱ्या यात्रेकरूंची गैरसोय होणार आहे. परंतु भाविकांच्या गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या आगारात चालक-वाहक आहेत त्या ठिकाणांहून आंगणेवाडी यात्रा स्पेशल गाड्या सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
कुडाळ आगारातून एसटी सेवा
कुडाळ आगारातून २४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजल्यापासून चार गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कुडाळ-पेंडूर-कट्टा मार्गे अंगणेवाडी अशी वाहतूक करण्यात येणार आहे. दिवसभर ही वाहतूक सुरु राहणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ आगाराचे आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी केले आहे.
(हेही वाचा मंत्र्यांच्या दौऱ्यात गर्दी चालते, मग आंगणेवाडी यात्रेवर निर्बंध का?)
विशेष रेल्वे गाड्या
मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष दोन गाड्या तर दादर ते सावंतवाडी रोड विशेष आठ विशेष गाड्या चालवणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात येत असल्याने, यंदाच्या यात्रेला परवनागी देण्यात आली आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून हजारो भाविक आंगणेवाडीच्या यात्रेला जात असतात.
Join Our WhatsApp Community