आषाढी एकादशीनिमित्त मराठवाड्यातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या

95

मध्य रेल्वे दिनांक ९ जुलै २०२२ आणि १० जुलै २०२२ रोजी जालना – पंढरपूर, नांदेड – पंढरपूर आणि औरंगाबाद – पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

आषाढी एकादशी विशेष गाड्यांची यादी खालीलप्रमाणे

जालना – पंढरपूर विशेष

  • गाडी क्रमांक 07468 आषाढी विशेष जालना येथून दिनांक ९ जुलै २०२२ रोजी १९.२० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 07469 आषाढी विशेष पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी २०.३० वाजता सुटेल आणि जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.
  • थांबे : परतूर, सेलू, मानवत रोड, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन, कुर्डुवाडी.
  • संरचना : २ शयनयान, ४ द्वितीय श्रेणी आरक्षित, २ लगेज व गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

( हेही वाचा : पावसाळ्यात आस्वाद घ्या खमंग भजीचा! देशातील प्रसिद्ध भजींचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? )

नांदेड – पंढरपूर विशेष

  • गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड येथून दिनांक ९ जुलै २०२२ रोजी १५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी १०.३५ वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 07499 विशेष पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता नांदेडला पोहोचेल.
  • थांबे : पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगांव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, तंदूर, सेडम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डुवाडी.
  • संरचना : एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, एक गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर व्हॅन.

औरंगाबाद – पंढरपूर विशेष

  • गाडी क्रमांक 07515 विशेष औरंगाबाद दिनांक ९ जुलै २०२२ रोजी २१.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 07516 विशेष पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी २३.०० वाजता सुटेल आणि औरंगाबाद येथे दुसऱ्या दिवशी १२.२० वाजता पोहोचेल.
  • थांबे : जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उस्मानाबाद, कुरुडवाडी.
  • संरचना : २ शयनयान, ५ द्वितीय श्रेणी आरक्षित, दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १० सामान्य द्वितीय श्रेणी.

भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष

  • गाडी क्रमांक 01123 विशेष गाडी भुसावळ येथून दिनांक ९ जुलै २०२२ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01130 विशेष पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी २२.३०वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता भुसावळला पोहोचेल.
  • थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.
  • संरचना : २ शयनयान, २ लगेज व गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण सुविधा

07469, 07499 आणि 07516 या आषाढी विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.