बोगस लसीकरण : मुख्य आरोपीची बँक खाती गोठवली!

मुंबईत बोगस लसीकरण प्रकरणी आजपर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

145

30 मे रोजी मुंबईच्या कांदिवली परिसरातील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत एका बनावट लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी अनेकांना बनावट लशी देण्यात आल्या होत्या. या बनावट लसीकरण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीची बँक खाती गोठवली आहेत. आता मुंबई पोलिसांनी बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे, अशी माहिती मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

लसीच्या जागी सलायनचे पाणी!

या बोगस लसीकरणामध्ये मुदत संपलेल्या लसी दिलाचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चारकोपमधील शिवम हॉस्पिटलचे संस्थापक शिवराज पतारिया आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. मुंबईत बोगस लसीकरण प्रकरणी आजपर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईत देण्यात आलेल्या लसीच्या जागी सलायनचे पाणी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या डिस्टील वॉटरचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्यामुळे या टोळीकडून लसी घेतलेल्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.  बोगस लसीकरण प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे, हे पथकाचे परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर प्रमुख असतील, मुंबईतील बोगस लसीकरण शिबिराचा पर्दाफाश केल्यानंतर सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

(हेही वाचा : बोगस लसीकरण : पाचवा गुन्हा दाखल, सहावी अटक! )

आतापर्यंत ७ गुन्हे दाखल!

बनावट लसीकरण शिबीर राबवल्याप्रकरणी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित आरोपीने आणखी ८ ठिकाणी अशाप्रकारच्या शिबीराचे आयोजन केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असून संबंधित महिला Co-WIN App वर डेटा अपलोड करण्याचे काम करायची. या महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे, असेही नांगरे पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.