JNPT to Gateway of India Ferry प्रवासासाठी आता स्पीडबोटचा पर्याय; जुन्या लाकडी बोटींना अलविदा

67
JNPT to Gateway of India Ferry प्रवासासाठी आता स्पीडबोटचा पर्याय; जुन्या लाकडी बोटींना अलविदा
JNPT to Gateway of India Ferry प्रवासासाठी आता स्पीडबोटचा पर्याय; जुन्या लाकडी बोटींना अलविदा

जेएनपीए (Jawaharlal Nehru Port Authority) बंदरातून मुंबईत येण्या जाण्यासाठी लाकडी बोटींची व्यवस्था आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी १६ फेऱ्या करीत प्रवासी वाहतूक करीत होत्या. यासाठी जेएनपीए दरमहा १९ लाख ६८ हजार रुपये खर्च करीत आहेत. मात्र सध्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नवीन वर्षांत बंदरातून प्रवाशांसाठी अद्ययावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत. (JNPT to Gateway of India Ferry)

(हेही वाचा – BMC CFC Center :महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात आता टोकन प्रणाली, जी दक्षिण विभागांत प्रथम सुरुवात)

यामुळे प्रवाशांना जेएनपीएतून मुंबई ३५ ते ४० मिनिटांत गाठता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. जेएनपीएने या बोटींच्या ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० खर्चाच्या निधीलाही २० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) कंपनीने दोन स्पीड बोटी पुरवठा करण्याची हमी दिली आहे. त्यानुसार उन्हाळी हंगामात २० ते २५ प्रवासी क्षमता व पावसाळी हंगामात १० ते १२ प्रवासी क्षमता असलेल्या हरित सागर आणि हरित नौका या दोन वेगवान बोटी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सेवेत दाखल होणार आहेत.

सध्या उरणपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी अटल सेतूही (Atal Setu) खुला झाला आहे. त्यामुळे या जेएनपीए-गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक रोडावली आहे. असे असले, तरी प्रवाशांना अधिक चांगला पर्याय देण्याचा जेएनपीएचा प्रयत्न आहे. (JNPT to Gateway of India Ferry)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.