Spicejet Airline company: अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली, कारण काय ? जाणून घ्या…

रामलला प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी स्पाइसजेटने २१ जानेवारीला एक विशेष विमान चालवले होते. ज्याचे उड्डाण दिल्लीहून झाले होते.

1044
Spicejet Airline company: अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली, कारण काय ? जाणून घ्या...

एअरलाईन कंपनी स्पाईसजेटने हैदराबाद-अयोध्या थेट विमान सेवा बंद केली आहे. प्रवाशांची मागणी घटल्याने स्पाईसजेटने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबादवरून अयोध्येला जाण्यासाठी आठवड्यातून ३ वेळा विमानसेवा सुरू करण्यात आली होती. (Spicejet Airline company)

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यामुळे मागणी कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुग्राममधील एअरलाइनने आपले अखेरचे उड्डाण १ जून रोजी केले होते. (Spicejet Airline company)

(हेही वाचा – T20 World Cup, Nassau County Cricket Stadium : न्यूयॉर्कमधील नसॉ काऊंटीच्या क्रिकेट स्टेडिअमवर जेव्हा बुलडोझर फिरला  )

मागणीनुसार चालवली जातात विमानं
स्पाइसजेटने हैदराबादहून अयोध्येसाठीची विमान सेवा बंद केली असली, तरी अयोध्या-चेन्नई मार्ग अद्याप सुरू आहे तसेच व्यावसायिक व्यवहार्यता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उड्डाणे निर्धारित केली जातात. असेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. (Spicejet Airline company)

अयोध्येसाठी नवीन उड्डाणांचा विस्तार…
रामलला प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी स्पाइसजेटने २१ जानेवारीला एक विशेष विमान चालवले होते. ज्याचे उड्डाण दिल्लीहून झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला अयोध्येत महर्षि वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर ३१ जानेवारीला दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह ८ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा स्पाइसजेटने केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.