सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या विमानतळावर स्पाइसजेटच्या (SpiceJet Plane) विमानाला आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्क केलेल्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाला मंगळवारी (२५ जुलै) संध्याकाळी आग लागली. विमानाच्या इंजिनचे काम सुरु असतांना ही आग लागली. तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
या घटनेचे (SpiceJet Plane) फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.
(हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार राजस्थान आणि गुजरातचा दौरा)
डीजीसीएने स्पाइसजेटच्या विमानांवर देखरेख वाढवली आहे
या घटनेनंतर डीजीसीएने स्पाइसजेटच्या (SpiceJet Plane) विमानांवर पाळत ठेवली आहे. DGCA ने एक निवेदन जारी केले की बोइंग 737 आणि Bombardier DHC Q-400 विमानांची संपूर्ण भारतात ११ ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण २३ विमानांच्या ताफ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
A SpiceJet aircraft catches fire at Delhi airport during engine maintenance works. The aircraft and maintenance personnel are safe, says the airline company. pic.twitter.com/ZOGFgAFK5w
— ANI (@ANI) July 25, 2023
अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले
स्पाइसजेटच्या (SpiceJet Plane) प्रवक्त्याने सांगितले की, २५ जुलै रोजी रात्री ८ वाजता ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, विमानतळावर Q400 विमानाच्या मेंटेनेंसचे काम सुरू होते. त्यानंतर विमानाच्या इंजिन क्रमांक १ चा फायर अलार्म वाजायला लागला आणि विमानातून आगीच्या ज्वाला उठू लागल्या.
अलार्म वाजताच देखभाल करणारे कर्मचारी सक्रिय झाले. त्यांनी फायर स्टिंगविशरच्या मदतीने आग विझवली. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. एअरलाइननुसार, Q400 विमानात (SpiceJet Plane) 78 ते 90 प्रवासी बसू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community