
अहमदाबादमधील (Ahmedabad) ट्रेनच्या शौचालयात एक स्पाय कॅमेरा सापडला आहे. रेल्वे पोलिसांनी एका हाऊसकीपिंग (Housekeeping) कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपी शौचालयात स्पाय कॅमेरे लावून महिलांचे व्हिडिओ बनवत असे. या घटनेमुळे रेल्वेत महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Zahiuddin Shaikh)
( हेही वाचा : पासपोर्टसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांना दिलासा; आता १५ दिवसात Passport घरपोच मिळणार)
ही संपूर्ण घटना १६ मार्च २०२५ रोजी घडली. जेव्हा मुंबईहून (Mumbai) भगत की कोठीला (Bhagat Ki Kothi) जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका हवाई दलाच्या सैनिकाला शौचालयात कॅमेरा बसवल्याचा संशय आला. शोध घेतल्यावर एक पॉवर बँक (Power bank) सापडली, ज्यामध्ये एक स्पाय कॅमेरा लपवलेला होता. कॅमेऱ्याला जोडलेल्या तारा कचऱ्याच्या डब्यात पडल्या होत्या. कॅमेऱ्याची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी जहिउद्दीन शेखला (Zahiuddin Shaikh) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Zahiuddin Shaikh) मुंबईत (Mumbai) राहतो आणि अनेक गाड्यांमध्ये हाऊसकीपिंग काम करतो. रेल्वे पोलिस किती गाड्यांमध्ये असे स्पाय कॅमेरे बसवले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत? तसेच, कॅमेऱ्यात कैद झालेला डेटा कुठे साठवला गेला आणि तो कोणाला विकला गेला? याबद्दल सविस्तर माहिती मिळवत आहेत. (Zahiuddin Shaikh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community