- विशेष प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी (पश्चिम) जुहू कोळीवाड्याचे सीमांकन झाले असून तेथे झोपू योजना लागू होत नाही, असे सांगत अंधेरी पश्चिम येथील आमदार अमित साटम यांनी या झोपू योजनेला (SRA Scheme) तीव्र विरोध केला आहे. स्थानिक रहिवाशांनी साटम यांच्याकडे दाद मागितल्यानंतर ही झोपू योजना साटम यांनी ठामपणे विरोध करत ही योजना थांबवण्यास भाग पाडले आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेणे एक ढोंग; भाजपाची टीका)
अंधेरी पश्चिम येथील जुहू कोळीवाडा येथील भूखंड क्रमांक १२१३ या जुहू कोळीवाडा गावठाण क्षेत्राचे सीमांकन पूर्ण झाले आहे. सरकार गावठाण आणि कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करत आहे. तथापि, यासाठी एक विकासक दिशाभूल करत आहे आणि स्थानिक रहिवाशांना धमकावून झोपू योजना (SRA Scheme) तिथे प्रस्तावित करत आहे, असे साटम यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना पत्र कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – Bangladesh बांगलादेशात कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली हिंदू विद्यार्थ्याची विद्यापिठातून हकालपट्टी)
या भूखंडावर कोणत्याही झोपू योजनेला (SRA Scheme) मंजुरी देऊ नये, असे साटम यांनी सांगितले. मी स्थानिकांच्या पाठीशी उभा असून त्यांच्यावर कसलाही अन्याय होणार नाही असे साटम यांनी सांगितले. जुहू कोळीवाड्यात खोटे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. स्थानिकांनी मला सांगितले की काही लोकांकडून जबरदस्तीने हमीपत्रे घेतली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे साटम म्हणाले. यांनी स्थानिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. रहिवाशांसोबत झालेल्या मीटिंग दरम्यान मला कळले की या ठिकाणी अनेक गैरव्यवहार होत आहेत, असल्याचे म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community