‘श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरली जाणार नाही’; पंतप्रधान Narendra Modi यांच्या सोबतच्या बैठकीत राष्ट्रपती दिसानायके यांचे आश्वासन

27
'श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरली जाणार नाही'; पंतप्रधान Narendra Modi यांच्या सोबतच्या बैठकीत राष्ट्रपती दिसानायके यांचे आश्वासन
'श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरली जाणार नाही'; पंतप्रधान Narendra Modi यांच्या सोबतच्या बैठकीत राष्ट्रपती दिसानायके यांचे आश्वासन

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारता शेजारील देश श्रीलंकेच्या (Sri Lanka) तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अनुरा कुमार दिसानायके यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या दरम्यान, भारत आणि श्रीलंकेच्या नेत्यांनी सात महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली.तसेच हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त होत असताना, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके (President Anura Kumara Dissanayake) यांनी भारताला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. (Narendra Modi)

श्रीलंकेचे (Sri Lanka) अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतासोबत संरक्षण, ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, आरोग्य आणि व्यापार यासह सात महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली.यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रपती दिसानायके यांनी आपल्या भाषणात त्यांनी, ‘श्रीलंकेची भूमिका मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की भारताच्या सुरक्षा हितसंबंधांविरुद्ध आणि प्रादेशिक स्थिरतेविरुद्ध श्रीलंका कोणत्याही प्रकारे आपली भूमी वापरू देणार नाही.’ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. राष्ट्रपती दिसानायके यांच्या आश्वासनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘भारताच्या हितांप्रती असलेल्या संवेदनशीलतेबद्दल मी राष्ट्रपती दिसानायके यांचे आभारी आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या करारांचे (India Sri Lanka Agreement) आम्ही स्वागत करतो.” असे म्हटले.

(हेही वाचा – भारतातील पहिल्या उभ्या समुद्री पुलाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन)

राष्ट्रपती दिसानायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेच्या पहिल्याच दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. यावेळी, त्यांनी दोन्ही देशांच्या ‘सामायिक भविष्यासाठी त्यांच्या भागीदारीला चालना देण्यासाठी’ संयुक्त दृष्टिकोनासह एकत्र काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्याच वेळी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (Ministry of External Affairs) म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या आर्थिक सुधारणा आणि विकासात त्याच्यासोबत उभे राहण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.